Paytm Cashback Offer: तुम्ही जर पेटीएम यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने खास कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. पेटीएमवरून एलपीजी सिलेंडर बुकिंग केल्यास तुम्हाला कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक ऑफर भारत गॅस, इंडियन आणि एचपी गॅस बुकिंगवर दिली जात आहे. कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला पेटीएमवरून सिलेंडर बुक करावा लागेल. विशेष म्हणजे तुम्ही अॅपवरून बुकिंग ट्रॅक देखील करू शकता.
हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
पेटीएमने माहिती दिली की, एलपीजी सिलेंडर बुकिंगवर कॅशबॅकचा फायदा यूजर्सला मिळेल. यासाठी नवीन यूजर्सला FIRSTGAS या कोडचा वापर करावा लागेल. या कोडचा वापर केल्यास यूजर्सला १५ रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. तर जुने यूजर्स WALLET50GAS कोडचा वापर करू शकतात. या कोडचा वापर केल्यास ५० रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल.
यूजर्स सिलेंडर बुक केल्यावर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून स्टेट्सला ट्रॅक करू शकतात. सिलेंडर ट्रॅकिंगचे फीचर इन अॅप देण्यात आले आहे. याद्वारे यूजर्सला बुकिंग प्रोसेस आणि बुक्ड सिलेंडरच्या डिलिव्हरी प्रोसेसबाबत माहिती मिळेल. पहिल्यांदा बुकिंग केल्यानंतर अॅप तुमची माहिती सेव्ह करते. तुम्हाला वारंवार माहिती द्यावी लागत नाही.
सहज बुक करू शकता एलपीजी सिलेंडर
पेटीएमच्या माध्यमातून सिलेडंर बुक करण्यासाठी सर्वात प्रथम फोनमध्ये अॅप ओपन करा. अॅप ओपन केल्यावर तुम्हाला Book Gas Cylinder टॅब दिसेल. हा पर्याय तुम्हाला रिचार्ज आणि बिल पेमेंट कॅटेगरीमध्ये मिळेल. यानंतर एलपीजी सिलेंडर सर्व्हिस प्रोव्हाइडरचा पर्याय निवडा.
आता तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर अथवा १७ आकडी एलपीजी आयडी टाका. यानंतर पेमेंट करावे लागेल. तुम्ही पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.