Google Pixel 8 Price eSakal
विज्ञान-तंत्र

Google Pixel 8 : गुगलचे नवीन 'पिक्सेल 8' आणि 'पिक्सेल 8 प्रो' स्मार्टफोन लाँच; पाहा फीचर्स अन् किंमत

Made by Google : कित्येक दिवसांपासून फॅन्स हे स्मार्टफोन लाँच होण्याची वाट पाहत होते.

Sudesh

गुगलचे दोन बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्मार्टफोन अखेर लाँच झाले आहेत. मेड बाय गुगल या इव्हेंटमध्ये पिक्सेल सीरीजमधील नवे पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो हे दोन फोन लाँच करण्यात आले. या सीरीजमध्ये नवीन G3 टेन्सॉर चिप असणार आहे. तसंच संपूर्ण फोनमध्ये एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

गुगल पिक्सेल 8 मध्ये नवीन प्रकारचा अ‍ॅक्च्वा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर पिक्सेल 8 प्रो मध्ये सुपर अ‍ॅक्च्वा डिस्प्ले देण्यात आला आहे. पिक्सेलच्या नवीन सीरीजमध्ये विविध प्रकारचे कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. तसंच, या फोनमध्ये टेम्परेचर सेन्सर देखील देण्यात आला आहे.

कसा आहे कॅमेरा?

पिक्सेल 8 प्रो स्मार्टफोनमधील प्रत्येक कॅमेरा अपग्रेड करण्यात आला आहे. कमी प्रकाशात चांगले फोटो घेणं, चांगले ग्रुप फोटो घेणं, अधिक नॅचरल स्किन टोन दाखवणं असे फीचर्स येत देण्यात आले आहेत.

व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना बॅकग्राउंड व्हॉईस नाहीसा करण्यासाठी खास फीचर यात देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये कित्येक प्रो फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

किती आहे किंमत?

'पिक्सेल 8'च्या बेस मॉडेलची किंमत 699 डॉलर्स एवढी असणार आहे. तर पिक्सेल 8 प्रो स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 999 डॉलर्स एवढी असणार आहे. गुगलने आज लाँच केलेल्या सर्व प्रॉडक्सची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. पुढील आठवड्यापासून याची शिपिंग सुरू होईल असं गुगलने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT