Tata Sumo History esakal
विज्ञान-तंत्र

Ratan Tata : 'या' मराठी माणसामुळे देण्यात आले 'Tata Sumo' हे नाव! कहाणी जाणून तुम्हीही रतन टाटांना कराल सलाम

Tata Sumo History : जमशेदजी टाटा (Jamshedji Tata) हे टाटाचे पहिले मालक होते, ज्यांनी देशात स्वतःची पहिली कार खरेदी केली.

सकाळ डिजिटल टीम

टाटा सुमोचे नाव तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल आणि अनेक चित्रपटांमध्ये नायकापासून खलनायकापर्यंत सर्वांना टाटा सुमोमध्ये बसलेले पाहिले असेल. पण, 'टाटा सुमो'मागील (Tata Sumo) कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

Tata Sumo History : मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना ॲक्शन सीन दाखवण्यासाठी चित्रपट निर्माते अनेकदा महागड्या कारची मदत घेतात. लक्झरी कारमधून नायक किंवा नायिकेची एन्ट्री सहसा प्रत्येक चित्रपटात दिसते, परंतु टाटा कंपनीची वाहने अनेकदा ॲक्शन सीनसाठी वापरली जातात. यापैकी एक वाहन 'टाटा सुमो' आहे. टाटा सुमोचे नाव तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल आणि अनेक चित्रपटांमध्ये नायकापासून खलनायकापर्यंत सर्वांना टाटा सुमोमध्ये बसलेले पाहिले असेल. पण, 'टाटा सुमो'मागील (Tata Sumo) कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

जमशेदजी टाटा (Jamshedji Tata) हे टाटाचे पहिले मालक होते, ज्यांनी देशात स्वतःची पहिली कार खरेदी केली. जेव्हा टाटा मोटर्स (Tata Motors) 1945 मध्ये सुरू झाली, तेव्हा ती रेल्वेसाठी लोकोमोटिव्ह इंजिन तयार करणारी पहिली कंपनी बनली. नंतर 1954 मध्ये ती भारतात ट्रक बनवणारी पहिली कंपनी बनली. त्यानंतर 1991 मध्ये अशी वेळ आली, जेव्हा टाटाने प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठी चमक दाखवली. कंपनीने टाटा सिएरा (Tata Sierra) लाँच केले.

Tata Sumo History

प्रवासी कार म्हणून सर्वाधिक पसंती

यासोबतच सर्वात स्वस्त कार नॅनो आणि लक्झरी कार जग्वारही टाटा मोटर्सने आणली. असे अनेक पराक्रम आहेत, जे टाटांनी (Tata Group) देशात पहिल्यांदा केले. त्याचप्रमाणे रतन टाटांनी देशाला 'टाटा सुमो' सारखी पहिली प्रवासी कार दिली, जी त्या काळात प्रवासी कार म्हणून सर्वाधिक पसंत केली गेली. या वाहनाच्या पॉवर आणि वैशिष्ट्यांव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट होती, जी लोकांना त्याकडे आकर्षित करत होती आणि ते म्हणजे त्याचं नाव. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे सुमंत मूळगावकर यांना गुरुस्थानी मानायचे. त्यांचा आदर आणि सन्मान राखण्यासाठी त्यांनी 'टाटा सुमो'ला त्यांचं नाव दिलं.

Tata Sumo History

तुमचा 'रतन टाटां'बद्दल नक्कीच आदर वाढेल

जेव्हा टाटा मोटर्सनं 'सुमो' नावाची प्रीमियम एसयूव्ही लॉन्च केली, तेव्हा त्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात दबदबा निर्माण केला. अल्पावधीतच ‘टाटा सुमो’ खूप लोकप्रिय झाली. हा तो काळ होता, जेव्हा टाटा सुमो खरेदी करणे म्हणजे लोकांसाठी आपला दर्जा वाढवण्यासारखे होते. या वाहनाचं नाव ऐकून लोकांना जपानचे प्रसिद्ध सुमो कुस्तीपटू आठवतात. त्याची भव्य रचना पाहून, बऱ्याच लोकांनी हे सत्य स्वीकारले की, त्याचे नाव प्रत्यक्षात सुमो कुस्तीपटूंनी प्रेरित केलं होतं. तर तसं मुळीच नव्हतं. या वाहनाच्या नावामागील कथा ऐकून तुमचा रतन टाटा यांच्याबद्दल नक्कीच आदर वाढेल.

Tata Sumo History

कोण आहेत सुमंत मूळगावकर?

वास्तविक, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी या कारचं नाव 'सुमंत मूळगावकर' (Sumant Moolgaokar) यांच्या नावावर ठेवलं आहे. सुमंत 'टाटा मोटर्स'चे आर्किटेक्ट आणि 'टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह'चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. याशिवाय सुमंत यांनी 'टाटा स्टील' कंपनीत उपाध्यक्ष आणि मारुती सुझुकीमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम केलं. टाटा समूहात भरीव योगदान देणाऱ्या आणि त्या काळातील सर्वात लोकप्रिय कार 'टाटा सुमो' असे नाव देणाऱ्या सुमंत मूळगावकर यांना रतन टाटांनी एक अद्भूत अशी भेट दिली.

Tata Sumo History

अथक परिश्रमाची रतन टाटांनी घेतली दखल

खरं तर सुमंत मूळगावकर हे देखील या सन्मानास पात्र होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच कंपनीचा त्यांच्यावर विश्वास बसला. एकीकडे कर्मचारी आपली प्रगती व्हावी म्हणून नेहमीच चांगले काम करत असे, तर सुमंत हे कंपनीची प्रगती व्हावी म्हणून घाम गाळत होते. सुमंत मुळगोकर यांनी यासाठी अनेक प्रयत्न केले.

Tata Sumo History

ट्रकचालकांसोबत जेवण आणि अभिप्राय

त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात सांगितले होते की, जेवणाच्या वेळेत जेव्हा प्रत्येकाला कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये बसून जेवण करायचे असते, तेव्हा सुमंत मूळगावकर तसे न करता ते बाजूलाच असलेल्या ढाब्यावर जेवायला जायचे. येथे येणाऱ्या ट्रकचालकांसोबत ते जेवण करायचे आणि अनेकदा ट्रकचालकांशी कंपनीच्या वाहनांबाबत चर्चा करून त्यांचा अभिप्राय जाणून घ्यायचे. त्यांच्या प्रतिक्रियांनुसार, आम्ही वाहनांचे नियोजन आणि सुधारणा करण्याचे काम करायचो, असे ते सांगत.

असं मिळालं 'टाटा सुमो' नाव

टाटा समूहाने सुमंत मूळगावकर यांची निष्ठा आणि समर्पण नेहमी लक्षात ठेवले. यानंतर जेव्हा 'टाटा सुमो' लाँच करण्याची पाळी आली, तेव्हा रतन टाटा यांनी सुमंत मूळगावकर यांच्या कंपनीतील योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या नावाची आणि आडनावाची 2 अक्षरे असलेली 'सुमो' असे नाव दिले. अशाप्रकारे टाटाच्या सर्वात लोकप्रिय कारला 'टाटा सुमो' हे नाव मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT