Realme 14x 5G mobile Launch features price esakal
विज्ञान-तंत्र

Realme 14x 5G : जबरदस्त फीचर्स अन् कमाल कॅमेरा, लाँच होतोय Realme 14x बजेट मोबाईल, फोनची सर्व माहिती एका क्लिकमध्ये..

Realme 14x 5G Smartphone Launch : Realme 12x च्या यशस्वी मॉडेलनंतर आता कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Saisimran Ghashi

Realme New Mobile Launch : भारतीय स्मार्टफोन बाजारात Realme पुन्हा एकदा नवा धमाका करणार आहे. Realme 14x हा कंपनीचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. Realme 12x च्या यशस्वी मॉडेलनंतर आता या नव्या स्मार्टफोनकडून मोठ्या अपेक्षा आहेत. Flipkart वर या फोनसाठी खास मायक्रोसाईट तयार करण्यात आली आहे, जिथे त्याचे काही मुख्य फीचर्स आता समोर आले आहेत.

Realme 14x 5G हा 15,000 रुपयांच्या श्रेणीत भारतातील पहिला IP69 रेटिंगसह येणारा स्मार्टफोन ठरणार आहे. ही रेटिंग डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट असल्याचं दर्शवते, ज्यामुळे हा फोन खडतर परिस्थितीतही टिकाव धरू शकतो. लाँचची तारीख 18 डिसेंबर 2024 असणार आहे.

किंमत

बेस मॉडेलची किंमत 15,000 रुपयांच्या आत, तर जास्त RAM व स्टोरेज असलेल्या व्हेरियंटसाठी किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि रंग पर्याय

Realme 14x तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल. काळा, सोनेरी आणि लाल. या मोबाईलची अगदी स्मार्ट आणि प्रीमियम डिझाइन युजर्सना आकर्षित करणार आहे.

दमदार फीचर्स

  • डिस्प्ले 6.67-इंचाचा HD+ IPS LCD स्क्रीन

  • 6,000mAh क्षमतेची बॅटरी, ज्यामुळे दीर्घकालीन वापर शक्य

  • ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह

स्टोरेज

6GB + 128GB

8GB + 128GB

8GB + 256GB

दरम्यान, Samsung ने व्यवसायासाठी खास Galaxy S24 Ultra आणि Galaxy S24 चे नवीन व्हेरियंट सादर केले आहेत. हे फोन व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आले असून, त्यात प्रगत टूल्सचा समावेश आहे.

Realme 14x च्या दमदार फीचर्समुळे बाजारात मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. कमी किमतीत उत्कृष्ट टिकाऊपणा आणि परफॉर्मन्स देणारा हा फोन खरेदीदारांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT