रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल आणि व्होटाफोन-आयडीया या कंपन्यांनी अलीकडेच रिचार्ज प्लॅनच्या (Recharge plan) किमती वाढवल्या आहेत. तुम्ही महागड्या रिचार्ज प्लॅनमध्ये परवडणारा प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला सर्वांत स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगत आहोत. जो दररोज 1GB डेटा देतो. रिलायन्स जिओ, एअरटेल (Airte) आणि व्होटाफोन-आयडीयाचे (Vodafone-Idea) रिचार्ज प्लॅन समाविष्ट केले आहेत.
रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओकडून (Reliance Jio) दररोज 1GB डेटा ऑफर करणारा सर्वांत स्वस्त रिचार्ज प्लॅन (Recharge plan) आहे. हा जिओचा १४९ रुपयांचा प्लॅन आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये एका दिवसाचा खर्च ७.४५ रुपये आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये वीस दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये एकूण 20GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.
एअरटेल
एअरटेलचा (Airte) सर्वांत स्वस्त प्लॅन 1GB डेटा हा २६५ रुपयांचा आहे. एका दिवसाचा खर्च पाहिला तर या प्लॅनमध्ये (Recharge plan) रोजचा खर्च ९.४६ रुपये आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
व्होडाफोन-आयडिया
व्होडाफोन-आयडियाचा (Vodafone-Idea) सर्वांत स्वस्त प्लॅन २६९ रुपयांचा असून, दररोज 1GB डेटा देतो. या प्लॅनची (Recharge plan) रोजची किंमत ९.६० रुपये आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच Vi Movies आणि TV साठी वेसिक एक्सेस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.