Redmi ने आज आपला बजेट Redmi 10A Sport स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या हँडसेटमध्ये 6GB रॅम, MediaTek Helio G25 चिपसेट आणि सिंगल 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. रॅम आणि स्टोरेज वगळता, या स्मार्टफोनची इतर सर्व फीचर्स Redmi 10A सारखीच आहेत. Redmi 10A भारतात 8,499 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.
Redmi 10A स्पोर्टची किंमत
Redmi 10A Sport हा 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज या एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. भारतात त्याची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन चारकोल ब्लॅक, सी ब्लू आणि स्लेट ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोन आता Amazon.in आणि Mi.com वर भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Redmi 10A Sport चे स्पेसिफिकेशन्स
Redmi 10A स्पोर्टमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 400nits पीक ब्राइटनेससह 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. Redmi चा हा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. याशिवाय या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या फोनची इंटरनल स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा कॅमेरा Xiaomi च्या AI कॅमेरा 5.0 सह येतो. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोन मध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन Android वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, GPS, मायक्रो USB आणि 3.5mm हेडफोन जॅक देत आहे. तसेच Redmi ने अलीकडेच भारतात आपला Redmi K50i लॉन्च केला आहे, जो भारतात 20,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.