Redmi Note 13 Series
Redmi Note 13 Series eSakal
विज्ञान-तंत्र

Redmi Note 13 Series : व्हिवो पाठोपाठ रेडमीचाही धमाका! एकाच दिवशी लाँच केले तीन तगडे स्मार्टफोन; पाहा फीचर्स अन् किंमत

Sudesh

चिनी स्मार्टफोन ब्रँड असणाऱ्या श्याओमीने भारतात Redmi Note 13 स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro Plus असे हे तीन मॉडेल्स आहेत. या सीरीजमधील टॉप मॉडेलमध्ये कंपनीने तब्बल 200MP प्रायमरी कॅमेरा दिला आहे.

या तिन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनच्या तिन्ही मॉडेलमध्ये वेगवेगळे प्रोसेसर देण्यात आले आहेत. बेस मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 प्रोसेसर आहे, प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7th जेन SOC सपोर्ट दिला आहे, तर टॉप मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 अल्ट्रा हा प्रोसेसर दिला आहे.

या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 108+8+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर प्रो आणि प्रो प्लस मॉडेलमध्ये 200+8+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तिन्ही मॉडेलमध्ये सेल्फीसाठी 16MP कॅमेरा दिला आहे.

फोनच्या बेस आणि प्रो प्लस मॉडेलमध्ये 5000 mAh क्षमतेची सारखीच बॅटरी देण्यात आली आहे. अर्थात, टॉप मॉडेलमध्ये 120W क्षमतेचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो, ज्यामुळे केवळ 19 मिनिटांमध्ये हा फोन पूर्ण चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रो मॉडेलमध्ये 5,100 क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

बेस मॉडेलचे तीन व्हेरियंट

Redmi Note 13 5G या स्मार्टफोनचे तीन स्टोरेज व्हेरियंट लाँच झाले आहेत. यातील 6GB+128GB स्टोरेजचा बेस व्हेरियंट 16,999 रुपयांना उपलब्ध आहे, 8GB+256GB स्टोरेज असणाऱ्या मिड व्हेरियंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर 12GB+256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे. बेस मॉडेलवर सध्या 1000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळत आहे.

अशाच प्रकारचे तीन स्टोरेज व्हेरियंट Redmi Note 13 Pro या मॉडेलचेही दिले आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 23,999 रुपये, 25,999 रुपये आणि 27,999 रुपये असणार आहे.

या फोनच्या Pro Plus मॉडेलमध्ये 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB असे तीन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यांची किंमत अनुक्रमे 29,999 रुपये, 31,999 रुपये आणि 33,999 रुपये एवढी आहे. हे स्मार्टफोन 10 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT