Reliance Jios Video Conferencing App Jiomeet Launched It Can Support 100 Users At Once  
विज्ञान-तंत्र

अरे वाह... व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी आले भारतीय अ‍ॅप

सकाळवृत्तसेवा

हो हे शक्य आहे , कारण झूम अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी जिओने एक नवीन अ‍ॅप डेव्हलप केले आहे. त्याचे नाव आहे ''जिओमिट अ‍ॅप''. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एकदम फ्री आणि भारतीय असे हे अ‍ॅप आहे. या जिओमिट अ‍ॅपद्वारे तुम्ही एकाचवेळी १०० जणांना ‘फ्री’मध्ये करू शकणार व्हिडिओ कॉल.

जिओमिट हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झालं असून जिओ त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही. कारण हे अ‍ॅप पूर्णतः मोफत आहे. या अ‍ॅपची खासियत म्हणजे एकाच वेळी याअ‍ॅपद्वारे १०० पेक्षा जास्त जणांना  व्हिडिओ कॉल करता येणार. हे जिओमिट अ‍ॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला वापरता येण्यासाठी सपोर्टेबल आहे. 

जिओमीट अ‍ॅपचे फीचर्स....

जिओमीट अ‍ॅपने तुम्ही  मिटिंग शेड्यूल करू शकणार आहात. आणि यात स्क्रीन शेअर करण्यासारखे अनेक फीचर्स जिओने दिलेले आहे. या अ‍ॅपद्वारे बिना कोडिंग आणि कोणालाही  इन्व्हाइट न करता तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता . तसेच लॅपटॉप आणि कॉम्पुटर असणाऱ्यांसाठी त्यांच्या डेस्कटॉपवरुन गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स यासारख्या ब्राउझरवरुनही जिओमिट अ‍ॅपचा वापर करु शकता.

 डाउनलोड करण्याचे प्रकार ...

१  स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्सनी प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर जिओमिट हे अ‍ॅप सर्च करुन डाउनलोड करता येणार . 
२  लॅपटॉप आणि कॉम्पुटर असणाऱ्यां यूजर्सनी  https://jiomeetpro.jio.com/home#download या वेबसाइटवर जाउन अॅप्लिकेशन डाउनलोड  करून हे अ‍ॅप वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक; २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असा असणार...

अग्रलेख - सतरंज्यांचा उठाव

मोठी बातमी! नववर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाचवेळी होणार पडताळणी; महसूल, शिक्षण विभागाचे असणार अधिकारी; बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश

आजचे राशिभविष्य - 27 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: कांदा नाही तरी पकोडे होतील सुपरहिट! पालक पकोड्यांची अशी रेसिपी कधी पाहिली नसेल

SCROLL FOR NEXT