to remove a virus from pc and mobile phone to use 7 tools in kolhapur
to remove a virus from pc and mobile phone to use 7 tools in kolhapur 
विज्ञान-तंत्र

तुमच्या फोन, पीसीला व्हायरसपासून सुरक्षित ठेवायचंय ? हे 7 टूल्स करतील मदत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक्स किंवा सूचना प्रायोगिक मंत्रालय हे  (MeitY) आपल्या डिजिटल डिवाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्रास काम करत असतात. यासाठी सायबर स्वच्छता केंद्र नावाने एक वेबसाईट सुद्धा बनवली आहे. यामध्ये स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा दुसरा कोणताही डिवाइसला सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी सात प्रकारच्या टूल्स बाबतीत माहिती दिली आहे. या सर्व इंडियन टूल्सना इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-आयएन) क्वीकहीलसोबत ऑपरेट केले जाते. 

या टूलच्या मदतीने बॉटनेट क्लिनिंग आणि मेलवरती नजर ठेवली जाते. बॉटनेटचा वापर डाटा चोरण्यासाठी, स्मैप पाठवण्यासाठी किंवा दुसऱ्या सायबर अटॅकसाठी होतो. त्यामुळे सरकारची अशी इच्छा आहे की, तुम्ही तुमच्या डिवाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बॉटनेटच्या अटॅकपासून वाचवण्यासाठी या सात टूल्सचा वापर करु शकता. 

क्विक हील बोट रिमुवल टूल

क्विकहीलच्या या टूलला तुम्ही फ्री डाऊनलोड करू शकता. याला इंडियन कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑपरेट करते. या टूलला मायक्रोसोफ्ट विंडोज ऑपरेटड कॉम्प्युटरसाठी बनवलेलं आहे. हे टूल कॉम्प्युटरच्या कोणत्याही बॉटनेट संक्रमणाचा पत्ता शोधून त्याला बाजूला करण्यासाठी मदत करते. हे टूल कॉम्प्युटरवर अँटी व्हायरस प्रोग्रामसोबत किंवा त्याव्यतिरिक्त वापरला जातो. आपला डेटा चोरी होण्यापासून वाचवते. परंतु कोणत्याही दुसऱ्या मेलवर हे सेफ्टी देऊ शकत नाही.


ईस्कॅन एंटीवायरस बॉटरिमूवल टूल

हासुद्धा बॉटनेटला बाजूला करण्याचे काम करतो. यालाही क्वीकहील प्रमाणेच फ्री डाउनलोड करता येते. हे टूल कम्प्युटर मधून कोणतेही बॉटनेट संक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी किंवा त्याला बाजूला करण्यासाठी मदत करतो. याच्या मदतीने कम्प्युटर स्कॅन करून व्हायरसचा शोध घेता येतो. परंतु हे दुसऱ्या मेलवरून सेफ्टी देत नाही. याचा उपयोग फक्त विंडोज ऑपरेटेड पीसीमध्ये होतो.

ईस्कॅन एव्ही टूलकिट

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ईस्कॅन एव्ही टूलकीटलाही ऑपरेट करते. या कीटला अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी तयार केले आहे. दुसऱ्या टूलप्रमाणे यालाही फ्री डाऊनलोड करता येते. आपल्या स्मार्टफोन प्रमाणेच उपलब्ध कोणत्याही बॉटनेटव्हायरसला स्कॅन करून त्याला बाजूला करता येते.

यूएसबी प्रतिरोध डेक्सटॉप सेक्युरिटी सोल्युशन

आपल्या डेक्सटॉपला सुरक्षित ठेवते. म्हणजेच पी. सी. मध्ये वापरल्या जाणाऱ्या पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, सेलफोन किंवा यूएसबीला पाठिंबा देणाऱ्या डिवाइसला कंट्रोल करता येते. यामध्ये पासवर्ड, प्रोटेक्शन डेटा, डेटा इंस्क्रीप्शन, ऑटो रन सिक्युरिटी आणि मेलवर डिटेक्शन असे अनेक फिचर्स समाविष्ट असतात. या टूललाही फ्री डाऊनलोड करता येते. हा मायक्रोसोफ्ट विंडोज 7 आणि विंडोज 10 मध्येही काम करतो,

एप संविद व्हाइटलिस्टिंग सॉफ्टवेअर

याचा उपयोग विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये केला जातो. हे डेक्सटॉप बेस्ट एप्लीकेशन व्हाइटलिस्टिंग म्हणून सोलुशन आहे. प्री, अॅप्रुव फाइलला एग्जीक्यूट करण्यासाठी परवानगी देतो. या सॉफ्टवेअरला विंडोज 8 - 64 बिट, विंडोज 7 - 64 बिट, विंडोज 10 - 32 बिट, विंडोज 10 - 64 बिट अशा वेगळेवेगळ्या प्रकारे डाऊनलोड करता येत.

जेएसगार्ड फॉर फायरफॉक्स वेब ब्राउझर

जेएसगार्ड एक ब्राउझर एक्सटेन्शन आहे. ज्याचा उपयोग फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी केला जातो. या ब्राउजरमध्ये एचटीएमएल किंवा जावास्क्रिप्टच्या मदतीने होणारे अटॅक थांबवता येतात. यालाही फ्री डाउनलोड करता येते. मोजीला फायरफॉक्सवर  इंटरनेट वापरणाऱ्या यूजर्ससाठी हे सगळ्यात महत्त्वाचे टूल आहे. 

जेएस फॉर गूगल क्रोम

मोजीला फायरफॉक्सप्रमाणे गुगल क्रोमसाठी जेएसगार्ड ब्राउझर एक्सटेन्शन बनवला जातो. हाही ब्राउझरवर एचटीएमएल आणि जावास्क्रिप्टच्या मदतीने होणाऱ्या अटॅकला थांबवतो. यालाही फ्री डाउनलोड करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT