Republic Day Sale
Republic Day Sale esakal
विज्ञान-तंत्र

Republic Day Sale : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये आयफोनवर मिळतोय भरपूर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

Monika Lonkar –Kumbhar

Republic Day Sale : भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन मोठ्या शॉपिंग वेबसाईट्सवरून लोक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात. या नवीन वर्षातील सर्वात मोठा सेल या दोन्ही वेबसाईट्सवर नुकताच सुरू झाला आहे.

या सेलचे नाव रिपब्लिक-डे सेल असे आहे. भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त या खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेलची सुरूवात १४ जानेवारीपासून अर्थात रविवारपासून करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी त्यांचा सेल सुरू केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी शेकडो कॅटेगरीमधील असंख्य उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे.

या प्रकारच्या सेलमधून अनेक ग्राहकांना आयफोन खरेदी करण्याची इच्छा असते. कारण, या सेलद्वारे त्यांना सवलतीसह आयफोन खरेदी करता येतो. त्यामुळे, अनेक जण या प्रकारच्या सेलची वाट पाहत असतात. या रिपब्लिक सेलमधून कोणत्या शॉपिंग साईटवर सर्वात मोठा डिस्काउंट आणि ऑफर आयफोनसाठी उपलब्ध आहे? ते आज आम्ही सांगणार आहोत.

फ्लिपकार्टवर iPhone वर मिळणाऱ्या ऑफर्स खालीलप्रमाणे

iphone 15 Plus :  हा आयफोन ग्राहक ७५ हजार ९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकतात.

iPhone 15 Pro : फ्लिपकार्टच्या या सेलमधून iPhone 15 Pro तुम्ही १ लाख ३० हजार २४० रूपयांना खरेदी करू शकता.

Iphone 15 pro Max : हा आयफोन तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमधून १,५६,१५० रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या आयफोनमध्ये तुम्हाला २५६GB चे स्टोरेज मिळेल.

iPhone 15 : फ्लिपकार्टवर आयफोनची सर्वोत्तम ऑफर या iPhone 15 वर उपलब्ध आहे. ग्राहक हा आयफोन ६५ हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकतात.

iPhone 14 : हा आयफोन तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमधून ५५ हजार ९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

अ‍ॅमेझॉनवर मिळणाऱ्या आयफोनवरील ऑफर्स खालीलप्रमाणे

iphone 15 Pro Max : हा आयफोन तुम्ही अ‍ॅमेझॉनच्य सेलमधून १,५६,९०० रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या आयफोनमध्ये तुम्हाला २५६GB चे स्टोरेज मिळेल.

iphone 15 Pro : हा आयफोन तुम्हाला अ‍ॅमेझॉनवरून १,३०,९९० रूपयांना खरेदी करता येईल. यामध्ये १२८GB चे स्टोरेज तुम्हाला मिळेल.

iphone 14 Pro Plus : अ‍ॅमेझॉनच्य सेलमधून हा आयफोन तुम्ही ६५ हजार ९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या आयफोनमध्ये तुम्हाला १२८GB चे स्टोरेज मिळेल.

iphone 14 : हा आयफोन तुम्ही अ‍ॅमेझॉनच्य सेलमधून ५७,९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 128GB चे स्टोरेज मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT