sickle-cell anemia .jpg
sickle-cell anemia .jpg 
विज्ञान-तंत्र

पुण्याच्या संशोधकांनी लावला 'सिकल सेल ऍनिमिया'वर नव्या औषधाचा शोध

सम्राट कदम

पुणे : विदर्भ, सापूतारा आणि मराठवाड्यासह देशभरातील 10 लाख 28 हजार लोक "सिकल पेशी रक्ताक्षया'चा सामना करत आहेत. त्यावर प्रभावी औषध शोधण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. जन्मदात्याकडून वारसामध्ये गुणसूत्राच्या माध्यमातून संक्रमित होणाऱ्या या रक्ताक्षयावर "रसायनशास्त्र विभागा'तील डॉ. पूजा दोशी आणि सय्यद मून्तजिब यांनी संशोधन केले आहे. 

मागील पाच वर्षाच्या संशोधनातून त्यांनी 'एलिझरिन' आणि 'आयसोकर्सिटीन' ही औषधे सिकल रक्ताक्षयासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वीच 'एलिझरिन'या औषधांवर त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. नुकताच 'आयसोकर्सिटीन'या औषधावर 'जर्नल ऑफ बायोमॉलिक्‍यूलर स्ट्रक्‍चर ऍण्ड डायनॅमिक्‍स' या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

डॉ. दोशी म्हणाल्या,"सध्या डॉक्‍टर 'हायड्रॉक्‍सी युरिया' या औषधाचा रक्तक्षयाच्या व्यवस्थापनासाठी वापर करतात. हे औषध रुग्णावर दुष्परिणाम करते. बाजारात उपलब्ध असलेले 'आयसोकर्सिटीन' सिकल पेशींच्या विरोधात प्रभावीपणे काम करत असल्याचे आमच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे औषध वनस्पतीतून मिळत असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही.'' 

संशोधक विद्यार्थी मून्तजिब म्हणाले,"रक्तक्षय झालेल्या रुग्णांमध्ये मुळातच रक्त कमी असल्याने संशोधनासाठी आवश्‍यक रक्ताचे नमुने मिळविणे अवघड गेले. परंतु विविध शिबिरांच्या माध्यमातून आम्ही रक्ताचे नमुने मिळविले आणि हे संशोधन पूर्ण केले.'' संशोधनासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पद्मश्री डॉ. सुदाम काटे आणि सिड्रकचे सह अनेक संस्थांचे सहकार्य लाभल्याचे डॉ.दोशी यांनी सांगितले. 

"देशातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रामुख्याने हा विकार आढळतो. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांना सध्या उपलब्ध असलेल्या बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट, नवीन रक्त चढवने या उपचार पद्धती घेणे शक्‍य नाही. आमच्या संशोधनामुळे स्वस्त दरात औषध उपलब्ध होणार आहे.'' 
- डॉ. पूजा दोशी, रसायनशास्त्र विभाग 

संशोधनाची वैशिष्ट्ये ः 
- रक्ताक्षयाच्या व्यवस्थापनासाठी संध्या वापरात येणाऱ्या पद्धती महागड्या त्याप्रमाणात हे औषध स्वस्त 
- सध्या वापरात असलेले 'हायड्रॉक्‍सी युरिया' कर्करोग प्रतिबंधक आहे. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. 
- संशोधकांनी शोधलेले 'ऍलिझरीन' आणि 'आयसोकर्सिटीन' आयुर्वेदिक. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. 
- आधीच्या औषधांपेक्षा प्रभावी असलेले ही औषधे बाजारात उपलब्ध आहे. किंमतही त्या प्रमाणात स्वस्त. 
- 'आयसोकर्सिटीन' शेवगा, सीताफळ, अंबा यांसारख्या विविध फळांमध्ये आढळते. तर 'मंजिष्ठा'मध्ये 'एलिझरिन' 

सिकल रक्तक्षय 
- जन्मदात्यांकडून जनुकीय विरासतीमध्ये प्राप्त 
- शरीरातील विविध अवयवांना ऑक्‍सिजन लाल रक्त पेशींमार्फत पाठविला जातो. 
- हिमोग्लोबिनच रूपांतपण 'हिमोग्लोबिन-एस'मध्ये होते. ते लाल रक्त पेशींचा आकार विळ्याच्या किंवा चंद्रकोरीच्या बदलतात 
- सामान्यतः या पेशी आकाराने गोल असतात, परंतु हा विकार झालेल्या व्यक्तीत चंद्रकोरीच्या आकाराच्या बनतात. 
- चंद्रकोरीचा आकार असलेल्या पेशी रक्त वहणात अडथळा निर्माण होतो. 

परिणाम 
- लाल रक्त पेशींची कमतरता. त्यांचे आयुर्मान 120 दिवसांवरून 20 ते 30 दिवसांवर येते 
- शरीरातील विविध भागांना ऑक्‍सिजनची कमतरता 
- रुग्णाला ठराविक कालावधीनंतर जोडांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. 
- स्ट्रोक, अंधत्व, छातीत दुखणे, फुप्फुसाचे विकार, पायाचा अल्सर, अवयव निकामी होणे 

सिकल रक्तक्षय आणि भारत 
- 2015 च्या आकडेवारी नुसार जगात 47.4 दशलक्ष लोकांना सिकल रक्तक्षय 
- त्याच वर्षी 1 लाख 14 हजार आठशे लोक मृत्युमुखी पडल्याची नोंद 
- आफ्रिका, भारत आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त 
- शेकडो वर्षांपूर्वी आफ्रिकेतून भारतात आला. देशात वर्षाला दहा लाख रुग्ण आढळतात 
- प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान सह देशातील आदिवासी, ग्रामीण भाग आणि सध्या शहरातील स्थलांतरित वस्तीमध्ये आढळतो 
- राज्यातील गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा यवतमाळ, नंदुरबारमध्ये 5000 हजाराहून अधिक रुग्ण 
- राज्यातील भिल्ल, माडिया, प्रधान आदी आदिवासी जनजातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 20 ते 35 टक्के रुग्ण आढळतात 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT