Cyber Security
Cyber Security esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Security : डीपफेक टेक्निकचा धोका वाढला, इंटरनेट विश्वात वावरताना महिलांनी राहावे सावध

सकाळ वृत्तसेवा

Cyber Security : सायबर चोरटे महिलांना नवनव्या पद्धतीने लक्ष्य करत असून राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार शहरात सायबर क्राईमचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये २१ प्रकरणे महिला अत्याचाराची आहेत. त्यामुळे इंटरनेट जगतात महिलांनी सजग राहाण्याची गरज आहे.

‘डीपफेक’ टेक्निक धोक्याचे

एआयचा उपयोग करून एखाद्या फोटो किंवा व्हिडीओवर कोणाचाही चेहरा मॉर्फ करता येतो. याच डीपफेक टेक्निकचा उपयोग करून पोर्न साईटवर मॉर्फ केलेले फोटो किंवा व्हिडीओ टाकण्याची प्रकरणे समोर आली आहेत.

सायबर अरेस्ट

कधी बनावट पोलिस बनून महिलांना व्हिडिओ कॉल करीत कागदपत्रे बेकायदेशीरपणे वापरल्याचे सांगितले जाते. व्हॅरिफिकेशन पूर्ण होतपर्यंत त्यांना खोलीत नजरकैद केले जाते. व्हेरिफिकेशनसाठी पैसे उकळले जाते. यूपी व हरयाणामध्ये महिलांना एक महिन्यापेक्षा जास्त काळ सायबर अरेस्ट राहावे लागले.

कार्ड नॉट प्रेजेंट फ्रॉड

काही घटनांमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे नंबर वापरून ऑनलाईन पद्धतीने एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. यासाठी त्या व्यक्तीचा रजिस्टर इमेल आयडी किंवा फिंगर प्रिन्ट वापर केला जातो.

ऑनलाईन इंटरनेट विश्वात ८० टक्के महिलांवर सायबर हल्ले होतात. त्यासाठी सोशल मीडिया व ईमेलवर टू-वे ऑथेंटिफिकेशन सेटिंग ऑन ठेवावी. मोबाईलमध्ये अॅन्टिव्हायरस इन्स्टॉल ठेवावा. परिचितांची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारावी.

- अमोल रंगारी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट

इंटरनेटवर सुरक्षेसाठी ‘हे’ करावे

  • शक्यतो मोबाईलचा जीपीएस बंद ठेवावा.

  • सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यता तपासा.

  • प्रोफाईल लॉक व गोपनीयता सेटिंग ऑन ठेवा.

  • सोशल मीडियावर स्वतःचे फोटो, पोस्ट किंवा शेअर करणे टाळा.

  • एखादा संशयित वाटल्यास त्याला त्वरित ब्लॉक करा.

  • आपली वैयक्तिक माहिती सामायिक करू नका.

  • सायबर क्राईमचे बळी पडल्यास त्वरित तक्रार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT