GTA 6 Rockstar Games eSakal
विज्ञान-तंत्र

GTA 6 : नव्या गेमबाबत रॉकस्टार गेम्सची मोठी घोषणा; जगभरातील गेमर्स झाले खुश

GTA 5 गेम लाँच होऊन आता जवळपास एक दशक लोटलं आहे.

Sudesh

जीटीए, म्हणजेच ग्रँड थेफ्ट ऑटो या गेमचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. तुम्ही जर 90s किड असाल, तर कदाचित तुमची पहिली कम्प्युटर गेम देखील GTA Vice City असू शकते. याच गेमचं पुढचं व्हर्जन GTA 6 बाबत Rockstar Games कंपनीने मोठी घोषणा केली आहे.

पुढील महिन्यात, म्हणजेच डिसेंबरमध्ये GTA 6 गेमचा ट्रेलर लाँच करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. पुढील वर्षी रॉकस्टार गेम्सला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने नव्या जीटीए गेमचा पहिला ट्रेलर लाँच करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

GTA 5 गेम लाँच होऊन आता जवळपास एक दशक लोटलं आहे. 17 सप्टेंबर 2023 यादिवशी ही गेम लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून गेमर्स या गेमच्या पुढच्या व्हर्जनची वाट पाहत होते. 2022 साली कंपनीने या गेमची डेव्हलपमेंट सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर गेमचं काही फुटेज लीक देखील झालं होतं. (Gaming News)

लीक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, GTA 6 गेममध्ये दोन मुख्य पात्रं असणार आहेत. यातील एक पात्र पुरूष आणि एक महिला असणार आहे. हे खरं असल्यास, फीमेल लीड कॅरेक्टर देण्याची जीटीएची ही पहिलीच वेळ असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

Latest Marathi News Update : रमेश केरे पाटील यांचे विखे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT