Evolve App: Personalized Mental Health for LGBTQIA+ Individuals esakal
विज्ञान-तंत्र

Evolve App : 'ईव्हॉल्व्ह' ॲपबद्दल ऐकलंय काय? 'या' विद्यार्थ्यांनी बनवलं LGBTQIA+ साठी ॲप!

LGBTQIA App : ॲपवर लवकरच सुरु होणार समुपदेशन आणि थेरपी

सकाळ डिजिटल टीम

Evolve App : आपल्या सर्वांना माहिती आहेच की मानसिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. पण एलजीबीटीक्यूआयए+ (LGBTQIA+) समुदायासाठी तर ते अधिकच जास्त महत्वाचं आहे. कारण या समुदायाला वेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांच्यासाठी खास ॲप तयार करण्यात आलं आहे. 'ईव्हॉल्व्ह' (Evolve) नावाचं हे मानसिक आरोग्य ॲप आहे.

अ‍ॅपची निर्मिती कशी झाली?

या अ‍ॅपच्या सह-संस्थापक रोहन अरोरा यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांतून प्रेरणा घेतली. त्यांनी काही माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, "मी देशातील टॉप एमबीए कॉलेजमध्ये होतो. पण तिचे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे माझं भविष्य कसं असेल याचा मी विचार करू शकत नव्हतो. या अनुभवामुळे मला लक्षात आलं की हा प्रश्न फक्त माझाच नाही तर या समुदायातील अनेकांना सतावतो. त्यामुळे मी त्यांना मदत करायचं ठरवलं."

रोहन आणि अंशुल कामत यांनी सुरुवातीला सर्वांसाठी मानसिक आरोग्य अॅप बनवण्याचा विचार केला होता. पण अनेक वापरकर्ते एलजीबीटीक्यूआयए+ समुदायातील असल्याचं लक्षात आलं. त्यानुसार अॅपमध्ये बदल करण्यात आले आणि ते सर्वांसाठी न करता या खास समुदायासाठी बनवण्यात आलं.

अ‍ॅपची वैशिष्ट्ये

  • LGBTQIA+ समुदायाच्या विशिष्ट आव्हानांवर आधारित.

  • स्व-संभाळ करण्यासाठी उपयुक्त.

  • व्यक्तीगत उद्दिष्टांवर आधारित 'जर्नीज'.

  • मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी तयार केलेला कंटेंट.

  • समुपदेशन आणि थेरपी सेवा (लवकरच येणार).

एलजीबीटीक्यूआयए+ समुदायातील अनेक लोक डिप्रेशन, जोखीमयुक्त लैंगिक आचरण, दारू आणि ड्रग्जच्या व्यसनांना बळी पडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे अॅप खास उपयुक्त आहे. या अॅपद्वारे ते स्वतःशी आणि समुदायातील इतर लोकांशी संवाद साधू शकतात.

आपण सर्व समान आहोत पण आपल्या सर्वांच्या आव्हानांमध्ये तफावत आहे. 'ईव्हॉल्व्ह' (Evolve App) अॅपद्वारे एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न आहे.

लवकरच अरोरा यांच्या अ‍ॅपवर थेटरपीची सुविधाही उपलब्ध करण्याचा विचार आहे. त्यामुळे समुपदेशनासाठी सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

एवोल्व्हच्या माध्यमातून अरोरा LGBTQIA+ समुदायासाठी एक मोठा आधार तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं हे अ‍ॅप केवळ अ‍ॅप नसून एक मोठी चळवळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT