Rolls Royce Arcadia Droptail
Rolls Royce Arcadia Droptail eSakal
विज्ञान-तंत्र

Rolls Royce Arcadia : रोल्स रॉयसने सादर केली जगातील सगळ्यात महागडी कार; लाकूड, काच अन् अ‍ॅल्युमिनियमचा केलाय वापर

Sudesh

Rolls Royce Arcadia Droptail Car : प्रीमियम कार्स बनवणाऱ्या रोल्स रॉयस कंपनीने आपली नवी कार सादर केली आहे. 'अर्काडिया ड्रॉपटेल' असं या गाडीचं नाव आहे. ही कार सध्या जगातील सर्वात महागडी कार झाली आहे. या कारची किंमत 31 मिलियन डॉलर्स, म्हणजेच तब्बल 257 कोटी रुपये आहे.

या कारचं नाव अर्काडिया (Arcadia) या ग्रीक शहरावरुन प्रेरित आहे. अर्काडियाचा अर्थ 'पृथ्वीवरील स्वर्ग' असा होतो. या कारचा अल्ट्रा-कस्टमाईज्ड स्टायलिश लुक आणि प्रीमियम इंटेरियर पाहून हे नाव गाडीला परफेक्ट असल्याचं स्पष्ट होतंय.

ही कार कंपनीने एका खास ग्राहकासाठी तयार केली आहे. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही कार त्या व्यक्तीला देण्यात आली.

काय आहे खास?

या कारचं इंटेरियर बनवण्यासाठी खास सँटॉस स्ट्रेट ग्रेन शिसम हार्डवूडचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड अगदी उच्च दर्जाचं असतं. कित्येक वर्षांपर्यंत हे लाकूड खराब होणार नाही याची हमी रोल्स रॉयसने दिली आहे. लाकडापासून हे इंटेरियर तयार करण्यासाठी तब्बल 8 हजार तासांपेक्षा अधिक वेळ लागला.

या कारच्या डॅशबोर्डमध्ये रोल्स रॉयस कंपनीने डिझाईन केलेलं खास घड्याळही देण्यात आलं आहे. यासाठी तब्बल दोन वर्षे रिसर्च करण्यात आला होता. रोडस्टर बॉडी स्टाईल असणारी ही कंपनीची पहिलीच गाडी आहे. याचं डिझाईन फॉर्म्युला वन रेसिंग कारवरुन प्रेरणा घेत तयार केलं आहे.

पेंटही आहे खास

रोल्स-रॉयस कंपनीच्या डिझाइनर्सनी ही कार पेंट करण्यासाठी नॅचुरल ड्युओटोन कलरवे डेव्हलप केला आहे. याच्या मुख्य बॉडीचा रंग सॉलिड व्हाईट आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम आणि काचेच्या कणांचाही वापर करण्यात आला आहे.

किती आहे स्पीड?

या कारमध्ये 6.75 लीटरचं ट्विन टर्बोचार्ज्ड V12 पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 593bhp पॉवर आणि 840Nm मॅक्स टॉर्क जनरेट करतं. अवघ्या पाच सेकंदांमध्ये हे इंजिन 0 ते 100 Kmph एवढा स्पीड घेऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT