Royal Enfield Hunter 350 Bike Launch Price Feature esakal
विज्ञान-तंत्र

Royal Enfield Hunter 350 : बाईक प्रेमींसाठी खुशखबर! मार्केटमध्ये आली Royal Enfield Hunter 350; जबरदस्त फीचर्स पाहा एका क्लिकवर

Royal Enfield Hunter 350 Bike Launch Price Feature : रॉयल एनफिल्डने नवीन ‘2025 हंटर 350’ लाँच केली आहे. ही बाईक स्लिप-असिस्ट क्लच, एलईडी हेडलॅम्प आणि टायप-सी चार्जिंगसारख्या आधुनिक फीचर्सनी सजलेली आहे.

Saisimran Ghashi

Hunter 350 Bike Details : रॉयल एनफिल्डने आपली लोकप्रिय बाईक Hunter 350 म्हणजेच 2025 Hunter 350 अधिकृतपणे लॉंच केली आहे. ही दमदार बाईक कंपनीच्या पहिल्यावहिल्या स्ट्रीट कल्चर फेस्टिव्हल ‘HunterHood’ दरम्यान एकाच वेळी मुंबई आणि दिल्ली येथे प्रदर्शित करण्यात आली. नव्या अवतारात हंटर 350 अधिक आकर्षक, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि रायडर्ससाठी अधिक आरामदायक ठरणार आहे.

Royal Enfield Hunter 350 Bike Price Feature

नवीन रंग आणि डिझाईन अपडेट्स

नव्या 2025 हंटर 350मध्ये तीन नव्या रंगसंगती आहेत. त्यामध्ये रिओ व्हाईट, टोकियो ब्लॅक आणि लंडन रेड. या रंगांमुळे बाईकला आधुनिक आणि तरुणाईला भावणारा रफ अँड टफ लूक प्राप्त झाला आहे. याशिवाय, बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स वाढवण्यात आला असून सीट अधिक आरामदायक करण्यात आली आहे. नवी सस्पेन्शन सिस्टीम आणि रायडरच्या पोझिशननुसार समरस होणारी इर्गोनॉमिक ट्रायअँगल यामुळे प्रवास अधिक सुरळीत होतो.

Royal Enfield Hunter 350 Bike Price Feature

टेक्निकल सुधारणा आणि फीचर्स

रॉयल एनफिल्डच्या माहितीनुसार, हंटर 350 ही त्यांच्या 350 सीसी श्रेणीतील पहिली बाईक आहे ज्यात स्लिप असिस्ट क्लच देण्यात आला आहे. यासोबतच एलईडी हेडलॅम्प्स, ट्रिपर पॉड आणि टायप-सी यूएसबी फास्ट चार्जिंग सारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत, जी दररोजच्या वापरात उपयुक्त ठरतात.

Royal Enfield Hunter 350 Bike Price Feature

या लॉंच दरम्यान रॉयल एनफिल्डचे चीफ कमर्शियल ऑफिसर यदविंदर सिंग गुलेरिया यांनी म्हणाले, “हंटर 350 ही आमच्या पोर्टफोलिओतील एक महत्वाची बाईक आहे. युवा वर्गासाठी परफेक्ट आणि शहरामध्ये चालवण्यासाठी आदर्श बाईक आहे. नवीन अपडेट्समुळे ती अजूनच आकर्षक बनली आहे.”

किंमत आणि उपलब्धता

नवीन 2025 Hunter 350 सध्या सर्व अधिकृत रॉयल एनफिल्ड शोरूम्समध्ये आणि royalenfield.com वर बुकिंगसाठी उपलब्ध आहे. यांच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत (एक्स-शोरूम चेन्नई).

  • Hunter Factory Black: 1,49,900 रुपये

  • Dapper Series (Rio White आणि Dapper Grey): 1,76,750 रुपये

  • Rebel Series (Tokyo Black, London Red आणि Rebel Blue): 1,81,750 रुपये

हंटर 350ची हे नवीन बाईक एडिशन केवळ एक बाईक नसून, रस्त्यांवर आत्मविश्वासाने फिरण्याचा एक अनुभव आहे. शहरातील ट्रॅफिक, दररोजच्या प्रवासासाठी आणि वीकेंड ट्रिप्ससाठी ही बाईक एक उत्तम पर्याय ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT