कोरोना काळात अनेकांच्या उद्योग-व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा अनेकजण ऑनलाइन व्यवसायावरच भर देत होते.
सध्याच्या डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात लघू आणि मध्यम व्यावसायिकांना जम बसवणे हे आव्हानात्मक झाले आहे. बलाढ्य ई-कॉमर्स, टेक कंपन्यांच्या स्पर्धेत त्यांचाही व्यवसाय-उद्योग लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी बिझ्झो या तंत्रज्ञानविषयक नव्या स्टार्टअपने सोशल मीडिया बिझिनेस डिजिटायजेशन व डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून एका क्लिकवर व्यावसायिक व ग्राहकांना सुविधा उपलब्ध केली आहे.
कोरोना काळात अनेकांच्या उद्योग-व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा अनेकजण ऑनलाइन व्यवसायावरच भर देत होते. त्यामुळे कोरोना काळ हा खऱ्या अर्थाने ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुगीचा काळ ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, परंतु आजही डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कंपन्या किंवा व्यावसायिकांची संख्या जेमतेमच आहे. त्यातही लघू व मध्यम क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. कोरोना काळात याच व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. किंबहुना त्यांना आपला व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने विस्तारित करण्यासाठी हवी तशी संधी मिळाली नाही.
ही बाब लक्षात घेता बिझ्झो या नव्या टेक स्टार्टअपने नवतंत्रज्ञानाच्या मदतीने विविध क्षेत्रातील छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय जगाच्या पाठीवर पोहोचवण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे केवळ व्यावसायिकांनाच नव्हे, तर ग्राहकांनाही विविध क्षेत्रातील सेवा-सुविधा एका क्लिकवर उपलब्ध केल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया डिजिटायझेशन या संकल्पनेवर आधारित या टेक स्टार्ट कंपनीने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, जस्ट डायल तसेच गुगल सारख्या डिजिटल माध्यमातून व्यावसायिकांना नवी संधी निर्माण केली आहे.
बिझ्झो काम असे करते...
विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचे डिजिटल व्यवस्थापन करण्यास मदत.
नोंदणी केलेल्या व्यवसायांच्या वस्तू व सेवांची माहिती बिझ्झोच्या अॅप व संकेतस्थळावर उपलब्ध करते.
ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू व सेवांची किंमत आणि उपलब्धता विषयक माहिती सादर करते.
बिझ्झोच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवसायाच्या संपूर्ण माहितीचे नियोजन.
गुगल माय बिझनेस, गूगल एनालिटिक्स, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम तसेच जस्ट डायलवरून आलेल्या सर्व माहिती नियोजन.
ग्राहकांना त्यांना हवी असलेली वस्तू व सेवांचे इत्थंभूत माहिती, किमती, सेवा प्रदात्यांची माहिती पाहता येते.
पन्नास हजार व्यावसायिकांचे उद्दिष्ट
प्राथमिक पातळीवर सध्या ट्रॅव्हल, पर्यटन, पर्सनल केअर, फिटनेस, आरोग्य, कला-छंद आदी क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी ऑनलाइन साह्य केले आहे. आगामी काळात इतरही क्षेत्रातील व्यवसायांचा अंतर्भाव बिझ्झोच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे बिझ्झोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत तोष्णीवाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.