Galaxy F56 5G Launched price features esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy F56 : आला रे आला, बजेट फोन आला! सॅमसंगने लॉन्च केला ‘F सिरीज’चा न्यू 5G मोबाईल, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

Galaxy F56 5G Launched price features : सॅमसंगने Galaxy F56 5G भारतात लॉन्च केला असून 45W फास्ट चार्जिंग आणि दमदार Exynos 1480 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. किंमत आणि इतर सर्व माहिती वाचा एका क्लिकवर..

Saisimran Ghashi

Samsung Galaxy F56 Deatails : आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने भारतीय मार्केटमध्य आपला नवीन आणि आकर्षक स्मार्टफोन Samsung Galaxy F56 5G लॉन्च केला आहे. ‘F सिरीज’मधील हा स्मार्टफोन दमदार कामगिरी, स्टायलिश डिझाईन आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्टसह अनेक कारणांनी चर्चेत आहे.

आकर्षक डिझाईन, पॉवरफुल परफॉर्मन्स

Galaxy F56 5G मध्ये 6.7 इंचांचा Full HD+ Super AMOLED+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह अतिशय स्मूथ अनुभव देतो. डिस्प्लेवर Corning Gorilla Glass Victus+ चे संरक्षण असून, 1,200 nits ब्राइटनेस मुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसतो. स्मार्टफोन केवळ 7.2mm जाड असून सॅमसंगच्या F सिरीजमधील सर्वात पातळ स्मार्टफोन आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

या स्मार्टफोनला सॅमसंगचा नवीन Exynos 1480 प्रोसेसर दिला असून तो 8GB LPDDR5X RAM आणि 128GB/256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. गेमिंग, मल्टीटास्किंग आणि अॅप्सची स्मूथ कामगिरी यासाठी हा फोन परिपूर्ण आहे.

कॅमेरा फीचर

Galaxy F56 5G मध्ये 50MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सुविधा आहे. तसेच 4K 30fps 10-bit HDR व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. 12MP सेल्फी कॅमेरा AI-आधारित फिचर्ससह येतो, जसे की ऑब्जेक्ट इरेजर, एडिट सजेशन्स इत्यादी.

बॅटरी आणि चार्जिंग

Galaxy F56 5G मध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे अगदी थोड्या वेळात फोन चार्ज होतो आणि दिवसभर टिकतो.

फोनमध्ये Samsung Knox Vault टेक्नॉलॉजी आहे, जी यूझरचा डेटा आणि पेमेंट्स सुरक्षित ठेवते. Samsung Wallet मुळे वापरकर्ते NFC द्वारे थेट पेमेंट देखील करू शकतात.

सॉफ्टवेअर सपोर्ट

सॅमसंगने Galaxy F56 5G ला तब्बल 6 वर्षांची Android OS व Security Updates ची हमी दिली आहे. तो सध्या One UI 7 वर आधारित Android 15 वर चालतो.

किंमत आणि उपलब्धता

Galaxy F56 5G चा 8GB + 128GB व्हेरिएंट 25,999 रुपये तर 8GB + 256GB व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 2 हजार रुपयांचा बँक डिस्काउंट समाविष्ट आहे. EMI पर्याय देखील 1,556 रुपये प्रति महिना पासून सुरु होतात. हा फोन हिरवा (Green) आणि जांभळा (Violet) या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.

Galaxy F56 5G हा केवळ एक स्मार्टफोन नसून फ्युचर-रेडी टेक्नॉलॉजी आणि सॅमसंगचा विश्वासार्ह ब्रँड एकत्र अनुभवण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT