Samsung Galaxy S22 Ultra phone entered in Guinness Book of World Record
Samsung Galaxy S22 Ultra phone entered in Guinness Book of World Record Sakal
विज्ञान-तंत्र

सॅमसंगच्या या मोबाईलची गिनीज बुकमध्ये नोंद; जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

सॅमसंगने आपला 'गॅलक्सी एस 22 अल्ट्रा' (Galaxy S22 Ultra) वापरून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या 'गॅलक्सी एस 22 अल्ट्रा' स्मार्टफोनच्या अनबॉक्सिंगची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या मोबाईलच्या मास अनबॉक्सिंगसाठी 5 मार्च ही तारीख घोषित करण्यात आली होती. 17 शहरांमधील 1820 ग्राहकांना फ्लॅगशिप स्मार्टफोन अनबॉक्स करण्याची संधी मिळाली.

यावेळी स्मार्टफोनचे प्री-बुकिंग करणाऱ्या युजर्सनी स्मार्टफोन अनबॉक्स केला. या वापरकर्त्यांना फोन मार्केट लॉन्च तारखेपूर्वी वितरित केले गेले. गॅलक्सी एस 22 अल्ट्रा हा एस पेन सपोर्टसह येणारा S मालिकेतील पहिला फ्लॅगशिप फोन आहे. (Samsung Galaxy S22 Ultra phone entered in Guinness Book of World Record)

1820 ग्राहकांनी मिळून हे काम केले-

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे एडजुडिकेट स्वप्नील डांगरीकर म्हणाले की, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की Samsung India Electronics Pvt Ltd च्या 1820 सहभागींनी एकाच वेळी हा स्मार्टफोन अनबॉक्सिंग केलं. या सहभागींना त्यांचे फोन प्राप्त केले आणि ते एका रेकॉर्डचा भाग बनले. असा प्रयत्न यापूर्वी कधीही केला गेला नव्हता, मी सॅमसंगचं अभिनंदन करतो."

यादरम्यान उपस्थित असणाऱ्या लोकांना एक स्पेशल लिमिटेड एडिशन बॉक्स तसेच Galaxy Watch 4 आणि Galaxy Buds 2 देखील दिले आहे. याशिवाय एक विशेष थँक्यू नोटही दिली आहे.

सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ संचालक आणि उत्पादन विपणन प्रमुख आदित्य बब्बर म्हणाले की, “आमच्यासाठी खरोखरच एक मोठा दिवस आहे आणि 17 शहरांमध्ये ही विक्रमी स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघाचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्या सर्वांचे आभार."

ही भारतातील फोनची किंमत आहे-

Samsung Galaxy S22 Ultra ची 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये असून याचं टॉप मॉडेल असलेल्या 12GB + 512GB प्रकारासाठी 1,18,999 रुपये मोजावे लागतील.

जाणून घ्या फोनमध्ये काय खास?-

-Galaxy S22 Ultra मध्ये नायटोग्राफी फीचर, सुपरफास्ट 45W चार्ज आणि S Pen यासह अनेक वैशिष्ट्ये

-6.8-इंचाचा EDGE QHD+ डायनॅमिक सुपर AMOLED डिस्प्ले तसेच 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट

- 4nm वर आधारित Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर

- Samsung Galaxy S22 Ultra Android 12 आधारित One UI 4.1

- 5000mAh बॅटरी, 15W वायरलेस, 45W वायर्ड आणि वायरलेस पॉवर शेअर सपोर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT