sbi balance enquiry via missed call whatsapp sms esakal
विज्ञान-तंत्र

SBI Balance Check Tips : घरबसल्या चेक करा लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता बँकेत जमा झाला काय; या आहेत सोप्या ट्रिक्स

sbi balance check : घरबसल्या कोणत्याच UPI माध्यमाशिवाय एसबीआय (SBI) खाते शिल्लक ऑनलाइन तपासायची असेल तर आम्ही तुम्हाला बॅलेन्स तपासण्याच्या विविध पद्धतींबद्दल माहिती देत सांगणार आहोत.

Saisimran Ghashi

SBI Balance Check Tips : आपल्या स्मार्टफोनच्या काही क्लिक्समध्ये आपल्या एसबीआय बँकेची खाते शिल्लक म्हणजे अकाऊंट बॅलेन्स तपासणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता बँकेत जमा झाला की नाही हे चेक करण्यासाठी आता तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

जर तुम्हालाही घरबसल्या कोणत्याच UPI माध्यमाशिवाय एसबीआय (SBI) खाते शिल्लक ऑनलाइन तपासायची असेल तर आम्ही तुम्हाला बॅलेन्स तपासण्याच्या विविध पद्धतींबद्दल माहिती देत सांगणार आहोत.यामध्ये कॉल,मेसेज आणि whatsapp द्वारे तुम्ही माहिती मिळवू शकता. चला तर पाहूया...

मिस्ड कॉल बँकिंगद्वारे

आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 09223488888 यावर REG<space>खाते क्रमांक असा मेसेज पाठवा.

नोंदणी झाल्यानंतर आपणास एसबीआय खाते शिल्लक तपासण्यासाठी 9223766666 आणि मिनी स्टेटमेंटसाठी 9223866666 या टोल फ्री क्रमांकांवर मिस्ड कॉल करा.

व्हॉट्सअॅप बँकिंगद्वारे

+919022690226 हा क्रमांक तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

व्हॉट्सअॅपवर जा आणि या क्रमांकावर शोधा.

चॅट बॉक्समध्ये Hi असा मेसेज टाइप करा.

आता Get Balance या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्याला खाते शिल्लक मिळेल.

एसएमएसद्वारे तपासणी

आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून +919223766666 यावर BAL असा मेसेज पाठवा.

खाते शिल्लक मिळवण्यासाठी BAL, मिनी स्टेटमेंटसाठी MSTMT आणि MOD बॅलेन्ससाठी MODBAL असा मेसेज पाठवा.

योनो अॅपद्वारे एसबीआय खाते शिल्लक तपासणे

योनो अॅप डाउनलोड करा आणि लॉग इन करा.

PIN किंवा बायोमेट्रिक्स सेट करा.

होम स्क्रीनवर View Balance पर्याय दिसणार आहे.

यावर क्लिक करा आणि आपल्याला खाते शिल्लक दिसेल.

नेट बँकिंगद्वारे एसबीआय खाते शिल्लक तपासणे

  • https://www.onlinesbi.sbi/ या वेबसाइटवर जा.

  • पर्सनल बँकिंग अंतर्गत लॉग इनवर क्लिक करा.

  • युजरनेम, पासवर्ड आणि इमेज कॅप्चा कोड टाका.

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका.

  • होमपेजवर Account Summary टॅबवर जा आणि Transactions Accounts अंतर्गत Click here for balance पर्याय निवडा.

आता तुम्ही अगदी सहजपणे या सोप्या पद्धतीने SBI खाते शिल्लक तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT