TVS Jupiter Scooter esakal
विज्ञान-तंत्र

TVS Jupiter फक्त ३० हजारात करा खरेदी, एका वर्षाची मिळतेय वाॅरंटी

अधिक मायलेज देणारी टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर

सकाळ डिजिटल टीम

दुचाकी सेक्शनमध्ये लांब मायलेजचा दावा करणाऱ्या स्कूटर्सची मोठी रेंज आहे. यात टीव्हीएस, होंडा, हिरो, सुझुकी आणि यामाहा सारख्या कंपन्यांचे स्कूटर्स मोठ्या संख्येने आहेत. त्यातील आम्ही तुम्हाला अधिक मायलेज देणाऱ्या टीव्हीएस ज्युपिटरवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सांगणार आहोत. टीव्हीएस ज्युपिटरची (TVS Jupiter) सुरुवातीची किंमत ६६ हजार २७३ रुपये आहे. जी टाॅप माॅडलमध्ये गेल्यावर ७६ हजार ५७३ रुपयांपर्यंत जाते. मात्र एका ऑफरच्या माध्यमातून ज्यूपिटर स्कूटर निम्म्या किंमतीत म्हणजे केवळ ३० हजारांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. टीव्हीएस ज्युपिटरवर ऑफर दिली आहे BIKES24 ने. जी एक सेकंड हँड टु व्हिलर खरेदी-विक्री करणारी वेबसाईट आहे. तिने आपल्या वेबसाईटवर स्कूटर लिस्ट केली असून तिची किंमत ३० हजार रुपये ठेवली आहे.

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या ज्युपिटरचे माॅडल २०१५ चे आहे. ती आतापर्यंत ४३ हजार ४१८ किलोमीटरपर्यंत धावली आहे. या टीव्हीएस ज्युपिटर स्कूटरची ऑनरशीप फर्स्ट आहे. ती दिल्लीच्या डीएल ०८ आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे. कंपनी ही स्कूटर खरेदी केल्यावर एक वर्षाच्या वाॅरंटीचा प्लॅन देत आहे. त्याबरोबरच सात दिवसाच्या आत मनी बॅक गॅरंटीही देऊ करित आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार ही स्कूटर खरेदी केल्यानंतर सात दिवसात ती तुम्हाला आवडली नाहीतर तुम्ही तिला कंपनीला परत करु शकता. त्यानंतर कंपनी तुम्हाला पूर्ण पेमेंट परत करेल.

टीव्हीएस ज्युपिटरवर मिळणाऱ्या ऑफरविषयी जाणून घेतल्यानंतर आता तिच्या फिचर्स आणि मायलेज पाहू..

टीव्हीएस ज्युपिटर ही एक अधिक मायलेज देणारी स्कूटर आहे. तिला कंपनीने सहा व्हेरिएंटमध्ये बाजारात सादर केले आहे. या स्कूटरमध्ये सिंगल सिलिंडरचे १४०९.७ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. जे फ्युल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ७.८८ पीएसचे पाॅवर आणि ८.८ एनएम पीक टाॅर्क जनरेट करते. या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक दिले गेले आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टिमविषयी बोलाल तर कंपनीने तिच्या फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे. टीव्हीएस ज्युपिटरच्या मायलेज बाबत कंपनीचा दावा आहे, की ती ६४ किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते आणि हे मायलेज आराईद्वार प्रमाणित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT