WhatsApp Latest Feature sakal
विज्ञान-तंत्र

स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा WhatsApp मेसेज, जाणून घ्या कसे

कोणत्याही फोनवर WhatsApp वर आलेल्या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी फोनची स्क्रीन अनलॉक करणे गरजेचे असते.

सकाळ डिजिटल टीम

दिग्गद अॅपल कंपनी त्याच्या आयफोन स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनेक नव नवीन वैशिष्ट्ये देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु, आयफोनवर WhatsApp संदेशांना उत्तर देण्याचा एक अनोखा पर्यायदेखील आहे जो Android वर उपलब्ध नाही. आयफोनवरील या फिचरमध्ये फोनची स्क्रीन लॉक असतानाही व्हॉट्सअॅप मेसेजला रिप्लाय देऊ शकता. आज आपण हे नवीन फिचर कसे काम करते ते जाणून घेणार आहोत. (iPhone WhatsApp New Feature)

कोणत्याही फोनवर WhatsApp वर आलेल्या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी फोनची स्क्रीन अनलॉक करणे गरजेचे असते. पण जर तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल, तर तुम्ही स्क्रीन लॉक असतानाही आलेल्या मेसेजला रिप्लाय देऊ शकता. स्क्रीन लॉक असतानाही रिप्लाय देता येणारे हे फीचर Apple iPhone 6s आणि iPhone 13, iPhone 12, iPhone 11 सारख्या नवीन iPhone मॉडेलसाठी उपलब्ध आहे.

असे करते कार्य

1. स्क्रीनवर आलेल्या व्हाट्सएप नोटिफिकेशनवर टॅप करा अथवा लॉन्ग प्रेस करा.

2. तुमचा रिप्लाय टाइप करा आणि सेंड बटनावर टॅप करा.

3. यासाठी तुम्हाला सेटिंग्सवर जाऊन हॅप्टिक सेटिंग्स समायोजित करावी लागतील. यासाठी Settings मध्ये जा, त्यानंतर accessibility वर जाऊन touch आणि haptic touch पर्याय निवडून touch duration वर टॅप करावे.

याशिवाय आयफोन वापरकर्ते सिरीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायला, व्हॉट्सअॅप कॉल करायला आणि आलेले मेसेज मोठ्याने वाचायलाही सांगू शकतात. परंतु ही वैशिष्ट्ये फक्त iOS 10.3 आणि त्यावरील आवृत्तीवर उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT