नागपूर रेल्वे स्थानकात QR Codeच्या वेगळ्या काउंटर sakal
विज्ञान-तंत्र

QR Code Payment : नागपूर रेल्वे स्थानकात QR Codeच्या वेगळ्या काउंटरने प्रवाशांना मनस्ताप; तिकिटासाठी लांबच लांब रांगा

रेल्वे स्थानकात क्यूआर कोड पेमेंट आणि रोख रक्कम तिकिटासाठी दोन वेगवेगळे काउंटर ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. क्यूआर कोड काउंटरवर कमी गर्दी आणि रोख रक्कम काउंटरवर जास्त गर्दी होत असल्याने, प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वे स्थानकात क्यूआर कोड पेमेंट आणि रोख रक्कम तिकिटासाठी दोन वेगवेगळे काउंटर ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. क्यूआर कोड काउंटरवर कमी गर्दी आणि रोख रक्कम काउंटरवर जास्त गर्दी होत असल्याने, प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. वेगवेगळे काउंटर न करता, क्यूआर कोड आणि रोख रकमेची सुविधा दोन्ही काउंटरवर द्यावी, अशी मागणी प्रवासी, संघटना आणि कर्मचारी युनियनकडून होत आहे.

शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावर पुनर्विकास कामे सुरू असल्याने आधीच प्रवाशांना मोठ्या अडथळ्यातून स्थानकावर पोहोचावे लागत आहे. त्यात आता तिकीट काउंटरच्या घोळामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. दसरा आणि दिवाळी सण जवळ येऊन ठेपल्याने तिकीट आरक्षण काउंटरवर प्रवाशांची गर्दी आहे.

तिकीट आरक्षणासाठी १२० दिवसांचा कालावधी असल्याने प्रवासी तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या काउंटरवर जातात. मात्र, रोख रक्कम स्वीकारणाऱ्या काउंटरवर प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.

पूर्वी स्थानकावर ३ रोख रकमेचे काउंटर होते. त्यात एक व्हीआयपी, वरिष्ठ नागरिकांसाठी आणि दोन सामान्य काउंटर होते. मात्र, दीड महिन्यापूर्वी एक काउंटर बंद करण्यात आले. दुसऱ्या काउंटरला क्यूआर कोड पेमेंटसाठी ठेवण्यात आले. तर तिसऱ्याला रोख रकमेसाठी उपलब्ध करून देण्यात आले. क्यूआर कोड काउंटरवर गर्दी कमी असते. उलट रोख रक्कम असलेल्या काउंटरवर मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांना रांगेत ताटकळत राहावे लागते.

काउंटरवर वेगवेगळे पेमेंट न ठेवता दोन्ही सुविधा सर्व काउंटर देण्याची मागणी होत आहे. सीआरएमएस आणि एनआरएमयू या कर्मचारी संघटनांनी प्रवाशांच्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

क्यूआर कोड काउंटरचा त्रास

  • तिकीट रद्द केल्यानंतर १० ते १५ दिवसानंतर पैसे परत मिळते.

  • तारखेत बदल करता येत नाही. त्याकरिता आधी तिकीट रद्द करावे लागते.

  • तात्काळ काढल्यास वेटिंग तिकीट मिळते. मशिन स्कॅनचीही समस्या आहे.

  • काउंटरवर दिवसाला केवळ ७० ते ८० फॉर्म येतात.

रोख रक्कम काउंटरची स्थिती

  • तिकीट रद्द केल्यानंतर त्वरित पैसे मिळतात.

  • तारखेत बदलही करता येते.

  • तत्काळ तिकीट घेण्याची तरतूद आहे.

  • तिकीट बनविण्यासाठी फारसा त्रास नाही.

  • काउंटरवर सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत १७० फॉर्म घेतल्या जाते.

यासंदर्भात प्रवासी संघटनेच्या वतीने आम्ही मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. क्यूआर कोड आणि रोख रकमेचे काऊंटर वेगवेगळे न ठेवता दोन्हीही सुविधा एकाच काऊंटरवर देण्यात याव्या.

- बसंतकुमार शुक्ला, सचिव- भारतीय यात्री केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT