Shelkewadi Pink Village Kolhapur esakal
विज्ञान-तंत्र

Shelkewadi : महाराष्ट्रातलं गुलाबी गाव पाहिलंत का? इथं वीजबील शून्य, स्वतःचं धरण अन् सौरऊर्जेवर केला कायापालट

Shelkewadi Pink Village Kolhapur : शेळकेवाडी गावाने सौरऊर्जा, बायोगॅस आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून शाश्वततेचं उदाहरण निर्माण केलं आहे.

Saisimran Ghashi

Shelkewadi Solar Village : कोल्हापूर जिल्ह्यातील एक लहानसं गाव शेळकेवाडी. अवघ्या १०२ घरं आणि १,००० लोकवस्ती. पण या छोट्याशा गावाने असाधारण वाटचाल करत स्वतःचं भविष्य उजळवलं आहे. एकेकाळी दुर्लक्षित असलेलं हे गाव आज संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारा, बायोगॅसचा उपयोग करणारा, गुलाबी रंगात रंगलेला हा यशस्वी प्रयोग आहे

ऊर्जास्वावलंबनाचं उदाहरण

शेळकेवाडीतील प्रत्येक घरात १-२ किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे गावाचा वीजबिलाचा खर्च शून्यावर आला आहे. फक्त घरेच नव्हे तर शाळा, व्यायामशाळा, जलपुरवठा व्यवस्था सर्व काही सौरऊर्जेवर चालते. ऊर्जेच्या बाबतीत संपूर्ण स्वावलंबन साधणाऱ्या या गावाचं मॉडेल आता इतर गावांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे.

कचऱ्यातून निर्माण होणार इंधन

इथे प्रत्येक घरात बायोगॅसशी जोडलेली शौचालयं आहेत, ज्यामुळे ओल्या कचऱ्याचं रूपांतर इंधनात केलं जातं. त्यामुळे गावातील एलपीजीवरील अवलंबन घटलं असून स्वच्छता आणि पर्यावरणस्नेही ऊर्जा यांचा संगम इथे प्रत्यक्ष अनुभवता येतो. ही प्रणाली ग्रामीण स्वच्छता व ऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनात एक मोठं पाऊल ठरली आहे.

गुलाबी रंगात नवे स्वप्न

शेळकेवाडीचा हा बदल केवळ तांत्रिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही व्यापक आहे. शासनाच्या अनुदानासोबतच गावकऱ्यांनी प्रत्येकी फक्त ५ हजारची मदत दिली. या एकत्रित प्रयत्नांमुळे हे मॉडेल केवळ शक्यच नव्हे, तर इतर गावांमध्येही अमलात आणण्यासारखं आहे. धोरण आणि जनतेचा सहभाग एकत्र आल्यास किती मोठा बदल साधता येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.

गावातील प्रत्येक घर गुलाबी रंगात रंगवलेलं आहे. "गुलाबी रंग आमच्या एकतेचं प्रतीक आहे," असं गावकरी अभिमानाने सांगतात. ही एकताच गावात सौर क्रांती, कचरा व्यवस्थापन आणि डिजिटल शासनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज शेळकेवाडीने राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धा जिंकल्या असून आता राष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळवण्याचं स्वप्न पाहत आहे.

शेवटी काय शिकता येतं?

ऊर्जेच्या क्षेत्रातील भारताची वाटचाल ही केवळ महानगरापुरती मर्यादित नाही. शेळकेवाडीसारखी छोटी गावंही मोठ्या परिवर्तनाची दिशा दाखवत आहेत. अत्यंत मर्यादित निधीमध्ये हे शक्य झालंय तर देशभरात ही क्रांती घडवणं अशक्य नाही

शेळकेवाडीच्या सोलर प्रयोगाने दाखवून दिलंय की, 'एकतेतून शक्ती' ही केवळ म्हण नाही ती कृतीत उतरवता येते आणि संपूर्ण गावाचा चेहरामोहराच बदलता येतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

दारूच्या ठेक्यावर कारवाई करायला पोलीस गेले, प्यायला गेलेल्यानं कार वेगात पळवली; ५ जणांचा चिरडून मृत्यू, अनेकजण जखमी

Amravati Child Abuse Case : संतापजनक! सावत्र मुलावर बापानं केला लैंगिक अत्याचार; स्वयंपाक घरात नेलं अन् जबरदस्तीनं त्याच्यावर..., आई पाहतच राहिली!

Delhi Tourism: दिल्लीकरांसाठी गुड न्यूज! लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू, जाणून घ्या कोणते सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT