Swiggy Pawlice eSakal
विज्ञान-तंत्र

Swiggy Pawlice : तुमचे हरवलेले पेट्स शोधून देणार स्विग्गी; लाँच केलं 'पॉलीस' फीचर

Lost Pets : तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्याची माहिती (फोटो, नाव, ओळख इत्यादी) तुम्ही स्विग्गीच्या अ‍ॅपमध्ये अपलोड करू शकता.

Sudesh

Swiggy Pawlice to Find Lost Pets : आधी केवळ फूड डिलिव्हरी अ‍ॅप असणाऱ्या स्विग्गीने आता आणखी बऱ्याच सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. यातच आता आणखी एका फीचरची भर पडली आहे. आता स्विग्गी चक्क तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्यांना देखील शोधून देणार आहे. 'स्विग्गी पॉलीस' असं या फीचरचं नाव आहे. स्विग्गीने आपल्या अ‍ॅपमध्येच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्विग्गी फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की माझ्याकडे देखील पेट्स आहेत. एक पॅरेंट म्हणून मला माहिती आहे की पेट्स हरवल्यानंतर किती काळजी आणि चिंता वाटते. अशी वेळ खरंतर कोणत्याही पेट पॅरेंटवर येऊ नये. मात्र, असं झालंच तर Swiggy Pawlice हे तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील.

कसं करणार काम?

तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्याची माहिती (फोटो, नाव, ओळख इत्यादी) तुम्ही स्विग्गीच्या अ‍ॅपमध्ये अपलोड करू शकता. (How Swiggy Pawlice works)

यानंतर स्विग्गीच्या डिलिव्हरी पार्टनर्सना ही माहिती शेअर केली जाईल. देशभरात त्यांचे तब्बल 3.5 लाखहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. हे डिलिव्हरी बॉय ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी ठिकठिकाणी जात असतात. त्यामुळे त्यांची मदत यासाठी घेतली जाऊ शकते.

एखाद्या डिलिव्हरी पार्टनरला हरवलेला पाळीव प्राणी दिसला, तर ते कंपनीला याबाबत माहिती देतील. डिलिव्हरी बॉईज स्वतः ते पेट्स ताब्यात घेणार नाहीत.

पेट्सना रेस्क्यू करण्यासाठी स्विग्गीने खास टीम तयार केली आहे. ही टीम लोकेशनला जाऊन ते पेट्स ताब्यात घेईल. यानंतर ही टीम पेट्सच्या मालकांना संपर्क साधेल आणि त्यांना त्यांच्या घरी सोडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

'VFX कौतुक पुरे! अभिनय कधी करणार?' करण जोहरचा बॉलिवूड कलाकारांना टोला; 'रामायण'च्या चर्चेदरम्यान वक्तव्य व्हायरल

Gokak Waterfall Flowing : गोकाक धबधब्याला मिळाली नवसंजीवनी! हिडकल जलाशयातून पाणी सोडताच पुन्हा प्रवाहित झाला धबधबा, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी साजरा केला बालदिन; केक वाटून मुलांच्या चेहऱ्यावर आणले हास्य

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

SCROLL FOR NEXT