Smart Phone मधील फोटोंची रिकव्हरी Esakal
विज्ञान-तंत्र

मोबाईलमधील Photo आणि Video चुकून झाले डिलीट तर नका करु चिंता

अँड्राॅइड फोनमध्ये असे काही फिचर देण्यात आले आहेत. ज्यामुळे डिलीट झालेले फोटो किंवा व्हिडीओ रिकव्हर करणं शक्य आहे

Kirti Wadkar

स्मार्टफोन हा सध्या आपल्या प्रत्येकासाठी एक महत्वाचं डिव्हाइस आहे. स्मार्टफोनचा Smart Phone वापर हा केवळ कॉलिंगपुरता उरलेला नाही. इतरही महत्वाची कामं म्हणजेच बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग आणि पेमेंट तसचं महत्वाचे दस्तावेज बाळगण्यासाठी स्मार्टफोनचा वापर वाढू लागला आहे. Smart Phone Usage tips in Marathi how to recover deleted photos

याचसोबत स्मार्टफोन आणि त्यातील कॅमेऱ्यामुळे आपल्याला आपल्या आठवणी फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात जतन करणं शक्य झालं आहे. मोबाईलमधील गॅलरीत Mobile Gallery अनेक खास क्षण आपण वेळोवेळी टिपत असतो. मोबाईलच्या गॅलरीमध्ये आठवणींचे अल्बम Album साठवले जातात.

काही वेळेस महत्वाच्या कागदपत्रांचे म्हणजेच आधारकार्ड Aadhar Card, पॅनकार्ड, रेल्वे किंवा इतर एखादं तिकीट, इतर ओळखपत्रांचे फोटो देखील आपण सेव्ह करून ठेवत असतो.

मात्र अनेकदा फोटो आणि व्हिडीओ जास्त झाल्याने ते डिलीट करण्याची वेळ आपल्यावर येते. अशात काही वेळेस महत्वाचे फोटो किंवा व्हिडीओ चुकून डिलीट होतात. एखादा महत्वाचा फोटो किंवा व्हिडीओ डिलीट झाल्यास चिंता वाढते. मात्र अँड्राॅइड फोनमध्ये असे काही फिचर देण्यात आले आहेत. ज्यामुळे डिलीट झालेले फोटो किंवा व्हिडीओ रिकव्हर करणं शक्य आहे.

android फोनच्या गॅलरी अॅपमध्ये एक खास फोल्डर देण्यात आलेलं असतं ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेले फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा मिळवू शकता. या फोल्डरमध्ये डिलीट केलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ ३० दिवसांपर्यंत सेव्ह राहतात. त्यानंतर ते कायमचे डिलीट होतात. त्यामुळे ३० दिवसांपर्यंत तुम्ही हा डेटा पुन्हा रिकव्हर करू शकता.

हे देखिल वाचा-

असे रिकव्हर करा फोटो

- गॅलरी अॅपमध्ये मेन्यूबारवर क्लिक करा.

- इथे तुम्हाला Recycle Bin हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.

- रिसायकल बिनमध्ये तुम्हाला डिलीट करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ दिसतील.

- यातील हवे असलेले फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट करा. त्यानंतर Restore वर क्लिक करा.

- अशा प्रकारे तुमचे डिलीट झालेले फोटो पुन्हा गॅलरीमध्ये सेव्ह होतील.

हे देखिल वाचा-

Google Photoच्या मदतीने रिकव्हर करा फोटो

तसंच जर तुम्ही गुगुल फोटो अॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ परत मिळवणं शक्य आहे. Google Photo अॅपमध्ये डिलीट कऱण्यात आलेले फोटो ६० दिवसांसाठी ट्रॅश फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात. त्यानंतर ते कायमचे डिलीट होतात. त्यामुळे ६० दिवसांच्या आत तुम्ही महत्वाचे फोटो पुन्हा मिळवू शकता.

- यासाठी तुमच्या अँड्रॉइड फोनमधील गुगुल फोटो अॅपवर क्लिक करा.

- त्यानंतर Libray पर्याय निवडून Bin पर्यायावर क्लिक करा.

- हवे असलेले फोटो सेलेक्ट करा.

- त्यानंतर रिस्टोर पर्याय क्लिक केल्यास तुमचे फोटो पुन्हा रिस्टोर होतील.

अशा प्रकारे तुम्ही मोबाईलमधील डिलीट झालेले फोटो तसचं व्हिडीओ पुन्हा रिस्टोर करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT