Smart TV Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Smart TV Offers : दिवाळीपूर्वीच घरी आणा स्मार्ट टीव्ही, मोठ्या स्क्रीनवर घ्या वर्ल्डकपचा आनंद! पाहा बेस्ट ऑफर्स

Amazon Flipkart Sale : मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीवर वर्ल्डकपचा आनंद घ्यायचा असेल, तर या बेस्ट ऑफर्सचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

Sudesh

दिवाळीमध्ये कित्येक जण नवीन गोष्टी खरेदी करतात. मात्र तुम्हाला जर नवीन टीव्ही घ्यायचा असेल, तर दिवाळीची वाट पाहण्याची गरज नाही. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर 8 ऑक्टोबरपासून मोठे सेल सुरू होत आहेत. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरमसाठ डिस्काउंट मिळत आहे. अमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना आजपासूनच (7 ऑक्टोबर) सेलचा अ‍ॅक्सेस मिळाला आहे.

विशेष म्हणजे, वनडे क्रिकेट वर्ल्डकप देखील नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीवर वर्ल्डकपचा आनंद घ्यायचा असेल, तर या बेस्ट ऑफर्सचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. या दोन्ही वेबसाईटवर कोणत्या टीव्हीवर बेस्ट डिस्काउंट मिळत आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

रेडमी

Redmi F Series 4K Ultra HD Smart LED Fire TV हा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुम्हाला अमेझॉन वेबसाईटवर जावं लागेल. 43 इंच स्क्रीनच्या या टीव्हीची मूळ किंमत 42,499 रुपये आहे. मात्र, अमेझॉनच्या सेलमध्ये हा टीव्ही केवळ 24,999 रुपयांना मिळणार आहे. यासोबतच रेडमीच्या इतर टीव्हींवर देखील अमेझॉन भरपूर सूट देत आहे.

एसर

Acer Advanced I Series या स्मार्ट टीव्हीची किंमत 49,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये हा 50 इंची स्क्रीनचा टीव्ही केवळ 27,399 रुपयांना मिळत आहे. यासोबतच एसरचे इतर टीव्हीदेखील फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटवर मिळत आहेत.

वनप्लस

OnePlus Y1S या 32 इंच स्क्रीन असलेल्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा टीव्ही केवळ 12,499 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच वनप्लसच्या इतर टीव्हींवर देखील बंपर डिस्काउंट मिळत आहे.

सॅमसंग

टीव्ही घेण्यासाठी आजही बऱ्याच जणांची पसंती सॅमसंगला आहे. Samsung Crystal 4K iSmart Series या 43 इंच स्क्रीनच्या टीव्हीवर फ्लिपकार्ट 37 टक्के डिस्काउंट देत आहे. त्यामुळे मूळ 52,900 रुपये किंमत असणारा हा टीव्ही केवळ 32,990 रुपयांना मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT