Half-Life Free Download eSakal
विज्ञान-तंत्र

Online Gaming : जगप्रसिद्ध व्हिडिओ गेम मोफत मिळवण्यासाठी तीन दिवस बाकी; प्रो-गेमर असाल तर चुकवू नका ही संधी!

Half-Life Game : जगातील सर्वात लोकप्रिय कम्प्युटर गेम्समध्ये हाफ-लाईफ या गेमचं नाव आवर्जून घेतलं जातं.

Sudesh

Half-Life Free Download : तुम्हाला जर कम्प्युटर गेम्सची आवड आहे, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Valve कंपनीची लेजेंडरी Half-Life गेम तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. Steam यूजर्ससाठी कंपनीने ही ऑफर दिली आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय कम्प्युटर गेम्समध्ये हाफ-लाईफ या गेमचं नाव आवर्जून घेतलं जातं. 1998 साली आलेल्या ओरिजिनल हाफ-लाईफ गेमचे पुढे काही सीक्वल देखील रिलीज झाले. मात्र तरीही ओरिजिनल Half-Life गेमची क्रेझ अजूनही कायम आहे. या गेममुळेच व्हॅल्व कंपनीला गेमिंग जगतात ओळख प्राप्त झाली.

ही गेम पहिल्यापासूनच स्टोअरवर 50 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध होती. मात्र तेव्हादेखील त्याची किंमत 9.99 डॉलर्स एवढी होती. मात्र स्टेम यूजर्स ही गेम आता मोफत खरेदी करू शकतात. 20 नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही अटी वा शर्ती लागू करण्यात आलेल्या नाहीत.

काय आहे हाफ-लाईफ?

हाफ-लाईफ ही एक सायन्स फिक्शन FPS गेम आहे. यामध्ये गॉर्डन फ्रीमन हे मुख्य मात्र आहे. हा एक वैज्ञानिक आहे, जो एलियन्सशी लढा देतो. 1998 साली लाँच झाल्यानंतर या गेमने गेमिंग जगतात धुमाकूळ घातला होता. त्या वर्षीचे 50 हून अधिक Game of The Year पुरस्कार हाफ-लाईफला मिळाले होते.

हाफ-लाईफ 3 येणार का?

Half-Life गेमची स्टोरीलाईन ही अजूनही संपलेली नाही. त्यामुळे जगभरातील गेमर्स 'Half-Life 3' गेमची वाट पाहत आहेत. दुर्दैवाने कंपनीने गेल्या दोन दशकांमध्ये याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. पुढील सीक्वल येणार की नाही हे भविष्यात कळेलच, मात्र तोपर्यंत ओरिजिनल गेम मोफत मिळवण्याची संधी कंपनीने फॅन्सना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

SCROLL FOR NEXT