गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यूट्यूबवरुन मुलाखत दिली.  esakal
विज्ञान-तंत्र

Sundar Pichai News : इंजिनिअर्ससाठी सुंदर पिचाई यांचे मार्गदर्शन : तंत्रज्ञानाची खोल समज गरजेची!

Project Astra: कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक लवकरच तुमच्या मदतीसाठी!

सकाळ वृत्तसेवा

Google CEO Interview : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यूट्यूबवरुन दिलेल्या मुलाखतीत भारतातील तरुण इंजिनिअर्सना भविष्यासाठी सज्ज होण्यासाठी महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) जगाभर वेगानं पसरत असताना तुम्ही यशस्वी होण्यासाठी फक्त पदवीधर नसून तंत्रज्ञानाची खोलवर समज असणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. ही मुलाखत कंटेंट निर्माता युटयूबर वरुण माय्या याने घेतली.

फांग (FAANG) कंपन्यांमध्ये (फेसबुक, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स आणि गूगल) काम मिळवण्यासाठीच्या मुलाखती पास करण्यावर भर देण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या मजबूत पायावर भर देणे गरजेचे आहे.

अनेक विद्यार्थी "हुशार" असूनही तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ही बाब चिंताजनक असल्याचे मत पिचाई यांनी व्यक्त केले. त्यांनी 3 इडियट चित्रपटाचा संदर्भ देत "खऱ्या यशाची प्राप्ती गोष्टी खोलात समजून घेतल्यानेच होते" आपल्या म्हणण्यावर भर दिला.

याच मुलाखतीत त्यांनी एक मोठी घोषणा केली. लवकरच गुगल ऑनलाइन शोधांना (Online Search) कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले उत्तर देणार आहेत. 'AI overviews' या नावाच्या या नवीन वैशिष्ट्यामुळे माहिती सर्च करताना तुम्हाला थोडक्यात सारांश आणि आवश्यक माहिती मिळेल. त्याबरोबर,अधिक माहितीसाठी तुम्ही लिंकवर क्लिक करून संबंधित वेबपृष्ठांवर देखील जाऊ शकता.

हे नवीन तंत्रज्ञान वेगळ्या आव्हानांनाही जन्म देत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित शोध इंजिनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, गूगलवरच्या वापरकर्त्यांचा भार कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छोटे प्रकाशक (small publisher) आणि माहिती निर्माते देखील या बदलामुळे चिंता व्यक्त करत आहेत.

सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीत "Project Astra" या त्यांच्या नवीन प्रकल्पाबद्दल देखील माहिती दिली. हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यक (AI Assiatant) तुमच्या सर्व छोट्या मोठ्या कामांमध्ये तुम्हाला मदत करतील.

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची स्पर्धा चांगलीच रंगणार आहे. गूगलसोबतच OpenAI सारख्या कंपन्याही या क्षेत्रात मोठी झेप घेत आहेत. एकूणच, भारतीय इंजिनियरिंग क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सुंदर पिचाई यांनी दिलेला सल्ला लक्षात घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT