ChatGPT AI use in India : भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित व्यासपीठांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, ChatGPT हे सर्वाधिक वापरले जाणारे व्यासपीठ असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. मात्र, नवीन AI प्लॅटफॉर्म DeepSeek देखील वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामुळे 3 पैकी 1 भारतीय AI वापरकर्ता या नव्या व्यासपीठावर जाण्याचा विचार करत आहे.
LocalCircles या ऑनलाइन सर्वेक्षण संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, 50% भारतीय इंटरनेट वापरकर्ते AI प्लॅटफॉर्म वापरत आहेत, तर 40% अजूनही माहिती शोधण्यासाठी Google आणि अन्य सर्च इंजिन्सला प्राधान्य देतात. मात्र, AI च्या मदतीने जलद व अचूक उत्तर मिळू लागल्यामुळे लोकांचा कल AI व्यासपीठांकडे वळत आहे.
ChatGPT सर्वाधिक लोकप्रिय, पण DeepSeek ची मागणी वाढतेय. या सर्वेक्षणात 15,377 जणांनी सहभाग घेतला, त्यापैकी-
28% लोक ChatGPT वापरतात,
9% लोक Perplexity वर विश्वास ठेवतात,
6% लोक Co-Pilot (Bing) वापरतात,
3% लोक "Gemini via Google" आणि Llama वापरतात,
6% लोक इतर कोणतेही AI प्लॅटफॉर्म वापरतात.
याचा अर्थ, ChatGPT हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे AI प्लॅटफॉर्म आहे.
चीनमध्ये विकसित झालेल्या DeepSeek या AI व्यासपीठाने प्रगत फीचर्स मोफत उपलब्ध करून दिल्याने अनेक वापरकर्ते त्याकडे वळू लागले आहेत.
8% लोक आधीच DeepSeek वर स्विच झाले आहेत.
15% लोक इतर प्लॅटफॉर्मही फ्री फीचर्स देत नसतील, तर DeepSeek वापरणार आहेत.
8% लोक कोणत्याही परिस्थितीत DeepSeek वापरणार आहेत.
38% लोक मात्र अन्य AI प्लॅटफॉर्मच वापरण्याचे ठरवले आहे.
LocalCircles च्या अहवालानुसार, भारतातील 3 पैकी 1 AI वापरकर्ता DeepSeek वापरण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ, AI क्षेत्रात स्पर्धा वाढणार असून, Google, ChatGPT आणि इतर AI व्यासपीठांना अधिक नाविन्यपूर्ण सुविधा द्याव्या लागणार आहेत.
AI चा वापर दिवसेंदिवस वाढत असताना, भारतातील वापरकर्ते कोणत्या व्यासपीठाला अधिक प्राधान्य देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.