टाटा पंच एसयूव्ही
टाटा पंच एसयूव्ही 
विज्ञान-तंत्र

Tataची नवीन कार, पाच लाखांमध्ये मिळू शकते Punch SUV

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - टाटा मोटर्स (Tata Motors) आगामी सणोत्सव काळात पंच (Tata Punch) ही कार बाजारात आणणार आहे. बाजारात दाखल होण्यापूर्वीच ही मिनी एसयूव्ही पंच चर्चाचा विषयी बनली आहे. टाटा पंच लाँचपूर्वीच वेगवेगळ्या रंगात पाहायला मिळाली आहे. टाटाची H2X काॅन्सेप्टवर आधारित पंचला डिलरकडे पाठवायलाही सुरुवात केली आहे. टाटा मोटर्सने नुकतेच तिचे टिझर प्रसिद्ध केले. त्यात डिझाईनसह अनेक फिचर्सविषयी माहिती देण्यात आली आहे. कारचा पुढचा भाग बऱ्याच प्रमाणात टाटा सफारी आणि टाटा हॅरियरशी मिळते-जुळते असू शकते. टाटा पंचमध्ये हॅरियरसारखे विशेष टेरेन मोड दिले गेले आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरुनही आरामदायक प्रवास करता येऊ शकेल. त्याबरोबरच त्यात इको आणि स्पोर्ट ड्रायव्ह मोड असेल. इंजिनचा विचार केला तर टाटा पंचमध्ये ५ स्पीड मॅन्युअलबरोबर १.२ लीटर पेट्रोलचे इंजिन असेल. हे इंजिन अल्ट्रोज आणि टियागोमध्येही वापरले जात आहे. यात एसयूव्हीला १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच केले जाऊ शकते. तिची स्पर्धा मारुती सुझुकी इग्निस आणि रेनो क्विडसारख्या कारबरोबर असेल.

काही दिवसांपूर्वी टाटा पंच ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये दिसली. नवीन फोटोत कार नारंगी-काळ्या रंगाच्या काॅम्बिनेशमध्ये पाहायला मिळाली आहे. याबरोबरच त्यात लेड डीआरएल (डे टाईम रनिंग लाइट्स) आणि ड्युअल टोन अलाय व्हिलही पाहायला मिळते. त्यामुळे असा अंदाज बांधला जातो की पंच ही एसयूव्हीमधील टाॅप व्हेरिएंट असू शकेल.

टाटा पंचमध्ये लेड डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, ब्लॅक बम्पर, अंडरबाॅडी आणि साईड क्लॅडिंग देण्यात आली आहे. कारमध्ये स्क्वायर व्हील आर्च, ब्लॅक-आऊट पिलर आणि फाॅक्स रुफ रेल्सही आहे. बाहेर आलेल्या छायाचित्रांनुसार या कारमध्ये सर्वोत्तम केबिन येईल. डॅशबोर्डवर अनेक हायलाईट्स आहे आणि एक मोठी क्रोम स्ट्रिप आहे. ती पूर्ण डॅशबोर्डवरही चालते. नेक्साॅनप्रमाणे डॅशबोर्डवर इन्फोटेनमेंट सिस्टम लावले आहे. त्यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, किलेस स्टार्ट-स्टाॅप अँड गो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम आदी सुविधा असण्याची शक्यता आहे. एक शक्यता वर्तवली जात आहे, की या मिनी एसयूव्ही कारची किंमत ५ लाख रुपयांच्या आसपास असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT