tata nexon 6 variants discontinued new gen model planned check list marathi auto news
tata nexon 6 variants discontinued new gen model planned check list marathi auto news  
विज्ञान-तंत्र

Tata Nexon: टाटाने बंद केले नेक्सॉनचे 6 व्हेरिएंट; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या यादी

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत टाटा नेक्सॉनचा समावेश आहे. तथापि, कंपनीने या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे 6 व्हेरिएंट बंद केले आहेत. त्यात नव्या जनरेशनचे व्हेरिएंट जोडण्याचा विचार आहे. काही रिपोर्टनुसार, कंपनीने नेक्सॉनचे XZ, XZA, XZ+ (O), XZA+ (O), XZ+ (O) डार्क आणि XZA+ (O) डार्क व्हेरिएंट बंद केले आहेत. कंपनी नेक्सॉनमध्ये ग्राहकांना 67 व्हेरिएंटचा ऑप्शन देते. यामध्ये पेट्रोलचे 19 व्हेरिएंट, डिझेलचे 18 व्हेरिएंट आणि ऑटोमॅटिकचे 30 व्हेरिएंट आहेत. Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.60 लाख ते 14.08 लाख रुपये आहे.

न्यू जनरेशन नेक्सॉन आणण्याची तयारी

टाटा या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची जनरेशन बदलण्याचा विचार करत आहे. तथापि, त्याची लॉन्च टाइमलाइन अद्याप उघड झालेली नाही. काही रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, नवीन जनरेशन Nexon एजाइल, लाइट अँड फ्लेक्सिबल आर्किटेक्चर (ALFA) साठी सध्याचा प्लॅटफॉर्म सोडून देईल. हेच प्लॅटफॉर्म टाटाच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ आणि पंच मिनी एसयूव्हीला सपोर्ट देतो.

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा नेक्सॉनला 1.2-लीटर, 3-सिलेंडर टर्बो आणि 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन पर्याय मिळतात.जिथे पेट्रोल युनिट 5,500rpm वर 120bhp पॉवर आणि 1,750rpm वर 170Nm टॉर्क देते. दुसरीकडे, ऑइल बर्नर, 4,000rpm वर 110bhp आणि 1,500rpm वर 260Nm चा दावा करते. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.

टाटा नेक्सॉनचे फीचर्स

यामध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत जे इतर मॉडेल्सपेक्षा चांगले ठरतात. यात 7-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple CarPlay आणि Android Auto शी कनेक्ट केली जाऊ शकते. याशिवाय डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी फंक्शनल स्टिअरिंग व्हील, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर अॅडजस्टेबल आऊट साइड रिअर व्ह्यू मिरर (ओआरव्हीएम), कॉर्नरिंग फॉग लॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT