Not AI but 'this' reason behind 12,000 job cuts at TCS esakal
विज्ञान-तंत्र

TCS Layoffs : एआय नाही तर 'या' कारणामुळे TCS च्या 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, सीईओने दिलं स्पष्ट उत्तर

Not AI but 'this' reason behind 12,000 job cuts at TCS : टीसीएसने तब्बल १२,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण सीईओने स्पष्ट केले आहे.

Saisimran Ghashi

  • टीसीएस कंपनी लवकरच 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे

  • ही कर्मचारी कपात एआयमुळे होत असल्याचे म्हटले जात होते

  • पण यामागे वेगळेच कारण असून, सीईओनी ते स्पष्ट केले आहे

TCS Job Cut Reason : टाटा कन्सलटंसी म्हणजेच TCS भारतातील नामवंत कंपनी आहे. पण या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलीये. कारण TCS लवकरच 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. हे अंजवरचे सर्वात मोठे ले ऑफ म्हटले जात आहे. अनेकांना असे वाटत होते की हे सर्व एआयमुळे होत आहे. पण कंपनीच्या आयटी अधिकाऱ्यांनी लोकांचा हा गैरसमज दूर केला आहे. ही कर्मचारी कपात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते TCSचे सीईओ के कृतीवसन म्हणाले ही एआयमुळे नोकऱ्यांना धोका नाहीये. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे आम्ही कर्मचारी कपात करतोय हे पूर्णपणे चुकीचे आहे. एअयाय कामाची गुणवत्ता वाढवू शकते पण मूळ काम तर मनुष्यालाच करावे लागेल. या कर्मचारी कपातीचे कारण आहे कौशल्याचा अभाव.

एआयमुळे उत्पादन क्षमतेत 20 टक्के वाढ झाली म्हणून आम्ही कर्मचारी कपात करत नाही तर संबंधित व्यक्ती कमी कुशल असल्याचे म्हटले आहे

ही कर्मचारी कपात आर्थिक वर्ष 2026 मध्ये केली जाईल. याचा परिणाम मध्यम अनुभव ते वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर होणार आहे. जे कनिष्ठ कर्मचारी अजूनही कोणत्या प्रकल्पात जोडले गेले नाहीयेत त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो.

FAQs

  1. Why is TCS cutting 12,000 jobs? / टीसीएस १२,००० नोकऱ्या का कमी करत आहे?
    👉 कौशल्य तफावत आणि नव्या कार्यपद्धतीमुळे कंपनीला काही कर्मचाऱ्यांना पुन्हा नियोजित करता आलं नाही म्हणून ही कपात केली जात आहे.

  2. Is this decision related to Artificial Intelligence? / ही नोकरकपात एआयमुळे आहे का?
    👉 नाही, टीसीएसने स्पष्ट केले आहे की ही कपात एआयमुळे नव्हे तर कौशल्य तफावतीमुळे झाली आहे.

  3. Who will be affected the most? / कोणत्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल?
    👉 मुख्यतः मध्यम ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना, तसेच काही प्रकल्पांवर न नसलेल्या कर्मचाऱ्यांना याचा परिणाम होईल.

  4. What support will TCS provide to affected employees? / प्रभावित कर्मचाऱ्यांना टीसीएस कशी मदत करेल?
    👉 टीसीएस प्रभावित कर्मचाऱ्यांना वेतन पॅकेज, आरोग्य विमा, मानसिक आरोग्य सल्ला आणि नोकरी शोधासाठी मदत उपलब्ध करून देईल.

  5. Is TCS still hiring despite the layoffs? / नोकरकपात असूनही टीसीएस नवीन भरती करत आहे का?
    👉 होय, टीसीएसने स्पष्ट केले आहे की ती भविष्यासाठी तयार राहण्यासाठी उच्च दर्जाच्या कौशल्यसंपन्न कर्मचाऱ्यांची भरती करत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Owaisi on Ind vs Pak Cricket match: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून आता ओवैसीचा संसदेत मोदींना सवाल, म्हणाले..

Nandani Elephant : हत्तीने भावना जिंकल्या! महादेवीला नांदणीतून निरोप, भट्टारकांच्या डोळ्यांत अश्रू; हत्तीणही रडली, संपूर्ण गावात हळहळ

मोठी बातमी! स्मार्ट मीटरमधून भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज; बिल थकल्यास सुरक्षा ठेवीतून वसुली, दररोज वीजेचा वापर किती? मोबाईलवर समजणार, वाचा...

Dharavi Firing: धक्कादायक! धारावीत गोळीबाराची घटना, महिला घरासमोर उभी होती अन् तेवढ्यात...

Pune News : कारगिल युद्धातील सैनिकाच्या कुटुंबीयांवर झुंडशाही; मध्यरात्री सिद्ध करावे लागले नागरिकत्व

SCROLL FOR NEXT