Technology Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Technology Tips : आता Redmi Band 2 देणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप

चीनी ब्रँड Xiaomi ने ग्लोबल मार्केट मध्ये Xiaomi Band 2 लॉन्च केलाय

सकाळ डिजिटल टीम

Technology Tips : चीनी ब्रँड Xiaomi ने ग्लोबल मार्केट मध्ये Xiaomi Band 2 लॉन्च केलाय. खिशाला परवडणारा हा फिटनेस ट्रॅकर डिसेंबरमध्ये चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला होता. या Redmi Band 2 मध्ये 247 पीपीआय पिक्सेल डेनसिटी असलेला 1.47-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या बजेट फिटनेस ट्रॅकरमध्ये 210mAh बॅटरी असून 14 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. Redmi Band 2 मध्ये 30 हून जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आलेत. कंपनीच्या या नवीन बँडमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग सेन्सर देण्यात आलेत. शिवाय हा बँड वॉटर रिसस्टेंट असून 5ATM रेटिंगसह येतो.

जपानमध्ये या Redmi Band 2 ची किंमत 4,990 येन (सुमारे 3200 रुपये) आहे. अर्ली बर्ड ऑफर मध्ये, कस्टमरला 6 फेब्रुवारीपर्यंत हा बँड 4,490 येन (सुमारे 2800 रुपये) मध्ये मिळू शकतो. हा बँड भारतात कधी लाँच होणार याची तारीख अजून डिक्लियर करण्यात आलेली नाही. या Redmi Band 2 मध्ये 172×320 पिक्सेल रिझोल्यूशन, 247ppi पिक्सेल डेनसिटी आणि 450nits पीक ब्राइटनेसचा 1.47-इंच TFT LCD डिस्प्ले पॅनेल आहे. हे वॉच 100 पेक्षा जास्त प्रीसेट वॉच फेससह प्री-लोड करण्यात आलेलं आहे. यातले काही फेसेस कस्टमाईज करता येऊ शकतात. आणि युजर्स वॉच फेससाठी गॅलरीमधून एखादा फोटो निवडू शकतात.

Redmi Band 2 मध्ये ऑप्टिकल हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग सेन्सर पॅक केले आहेत. तुमच्या स्टेप्स, झोप आणि फिमेल हेल्थ यासारखे ट्रॅकिंग फिचर्स यात देण्यात आलेत. या बजेट फिटनेस ट्रॅकरमध्ये एक एक्सेलेरोमीटर पॅक करतो आउटडोर रनिंग, योगा आणि हायकिंगसह 30 हून अधिक खेळ यात ट्रॅक करता येतात. Redmi Band 2 मध्ये 210mAh बॅटरी युनिट आहे आणि बँड एका चार्जवर 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो. पण जास्त वापर असेल तर बॅटरी लाईफ 6 दिवसांपर्यंतच बॅकअप देईल. Redmi च्या या नव्या फिटनेस ट्रॅकरला 5ATM रेटिंग आहे. हे वॉच 50 मीटरपर्यंत वॉटर रसिस्टेंट आहे.

Redmi Band 2 मध्ये TPU स्ट्रॅप्स आहेत. यात तुम्हाला आयव्हरी, ऑलिव्ह, स्नॅझी ग्रीन, ब्लू, ब्लॅक आणि पिंक असे ऑप्शन उपलब्ध आहेत. हे ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे आणि Android 6.0 आणि iOS 12 वर चालणार्‍या स्मार्टफोनला हे कनेक्ट करता येऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई- मडगांव/हटिया आणि पुणे -दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त होळी विशेष चालवणार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT