Mobile Phone
Mobile Phone Sakal
विज्ञान-तंत्र

खाण्यापिण्यासोबत बोलणंही महागणार; टेलिकॉम कंपन्या दरवाढीच्या विचारात

सकाळ डिजिटल टीम

टेलिकॉम ऑपरेटर्स लवकरच मोठी दरवाढ जाहीर करण्याचा विचार करत आहेत. प्रत्येक युजरमागचं आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी ही दरवाढ होणार असून निष्क्रिय युजर्सना काढून टाकण्यात येणार आहे. डिसेंबर २०२१ मध्ये दरवाढ करूनही सक्रिय ग्राहकांची संख्या वाढलेलीच आहे.

मात्र निष्क्रिय, कमी प्रमाणात वापर करणारे ग्राहक कंपन्यांनी गमावले आहेत. हे युजर्स कमी प्रमाणात फोन वापरणारे, निष्क्रिय आणि एक किंवा अधिक कनेक्शन्स घेतलेले आहेत. अशा प्रकारचे निष्क्रिय ग्राहक हटवल्याने रिलायन्स जिओच्या सक्रिय युजर्सची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही संख्या सर्वाधिक म्हणजे ९४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

टेलिकॉम क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितलं की भारती एअरटेल सध्या प्रत्येक युजरमागचं आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने विचार करत आहे आणि जिओ आपल्या नेटवर्कवरील युजर्स टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीचे प्रयत्न करतायत. भारती एअरटेलला या वर्षी प्रत्येक व्यक्तीमागे २०० रुपये वाढ होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबरच्या शेवटापर्यंत प्रति व्यक्ती उत्पन्न १६३ रुपये होतं. तसंच वोडाफोन आयडिया ही कंपनीसुद्धा याच प्रयत्नात आहेत. मात्र अद्याप कंपनीने आपले आकडे जाहीर केलेले नाहीत.

या दरवाढीमुळे वायरलेस सबस्क्राईबर्सच्या संख्येत गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र सक्रिय युजर्सची, बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. टेलिकॉम ही आता अत्यावश्यक सेवा झाल्याने हे होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT