Car Care Tips esakal
विज्ञान-तंत्र

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

Car Care Tips : सर्वत्र इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. अनेक कंपन्या जास्त रेंज असलेल्या कार बाजारात लाँच करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Car Care Tips : सर्वत्र इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. अनेक कंपन्या जास्त रेंज असलेल्या कार बाजारात लाँच करीत आहेत. पण, तुमची इलेक्ट्रिक कार अधिक चांगली रेंज देत असली तरीही काही चुकांमुळे रेंज कमी होऊ शकते. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

कारचा जास्त वेग

इलेक्ट्रिक कारची चांगली रेंज मिळवायची असेल तर कारचा वेग नियंत्रणात ठेवावा. इलेक्ट्रिक गाडी जास्त वेगाने चालवली तर रेंज कमी होऊ शकते. असे वाहन जास्त वेळ वापरल्यानेही बॅटरी खराब होते आणि बॅटरी लवकर संपू शकते. यासोबतच कारवरही विपरीत परिणाम होऊन नुकसान होण्याचा धोका वाढतो.

फास्ट चार्ज करणे

तुम्ही इलेक्ट्रिक कारमध्ये सतत फास्ट चार्जर वापरत असाल तर बॅटरीचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने, कार चालवताना बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे बॅटरीची रेंज कमी होऊ शकते. शक्य तितक्या सामान्य चार्जरने इलेक्ट्रिक कार चार्ज करावी. याच्या मदतीने बॅटरीचे आयुष्य आणि रेंज अधिक काळ टिकवून ठेवता येते.

जास्त सामान

जर तुम्ही इलेक्ट्रिक कार चालवत असाल आणि तुम्हाला त्यातून चांगली रेंज हवी असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन कधीही प्रवास करू नका. अनेक वेळा लोक त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान ठेवतात किंवा काही वेळा ते क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवतात. त्यामुळेदेखील कारची रेंज कमी होऊ शकते.

बॅटरीचा पूर्ण वापर करणे

इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत वापरू नका. जेव्हा गाडीची बॅटरी १० ते २० टक्के राहते तेव्हा कार चार्ज करावी. असे केल्याने बॅटरीची रेंज टिकून राहण्यास मदत होते. पण, ती वारंवार चार्ज केली तरी बॅटरी खराब होते आणि रेंज कमी होऊ शकते.

सर्व्हिसिंग न करणे

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिंसिग वेळेवर करावी. यामुळे कारचे आणि बॅटरीचे आयुष्य वाढते. तसेच इलेक्ट्रिक कारच्या टायरची देखील काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर; हायकोर्टानं याचिका काढली निकाली

Nagothane Flyover Cracks : उड्डाणपुलावर 60 दिवसांत चार ते सहा इंच रुंदीच्या 50 मीटर लांबीच्या भेगा, वाहतूक केली बंद

Viral Video : भाजप नेत्याचा भर रस्त्यात फोनवर बोलता बोलता मृत्यू; हार्ट अटॅक येताच खाली कोसळले अन्... CCTV मध्ये कैद थरारक घटना

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! वनजमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद; वनहक्कधारकांना मिळणार सुधारित सातबारा

SCROLL FOR NEXT