Smartwatch Battery
Smartwatch Battery esakal
विज्ञान-तंत्र

Smartwatch Battery : स्मार्टवॉचची बॅटरी लवकर संपते? मग, 'या' टिप्सच्या मदतीने करा ऑप्टिमाईझ

Monika Lonkar –Kumbhar

Smartwatch Battery : आजकाल तरूणाईमध्ये स्मार्टवॉचची भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे, अनेकांच्या हातात स्मार्टवॉच दिसते. परंतु, स्मार्टवॉचची बॅटरी लवकर संपते, अशी ही काहींची तक्रार असते. स्मार्टवॉचचा थोडा जरी वापर केला तरी त्याची बॅटरी लगेच डाऊन व्हायला लागते.

कंपन्या जरी १५ दिवसांच्या बॅटरी लाईफचे आश्वासन देत असल्या तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. जर तुमच्याही स्मार्टवॉचची बॅटरी सारखी चार्ज करावी लागत असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

स्मार्टवॉच वापरण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. कदाचित या वापरण्याच्या पद्धतीमुळे देखील स्मार्टवॉचची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागू शकते. परंतु, जर तुम्ही काही सेटिंग्जची काळजी घेतली तर तुमच्या स्मार्टवॉचची बॅटरी जास्त काळ टिकू शकते.

आज आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचची काळजी कशी घ्यायची त्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर स्मार्टवॉच वारंवार चार्ज करावे लागणार नाही.

स्क्रिन ब्राईटनेसकडे द्या लक्ष

स्मार्टवॉचची बॅटरी संपण्यामागचे प्रमुख कारण हे त्याचा स्क्रिन ब्राईटनेस असू शकते. स्क्रिन ब्राईटनेस वाढवल्यामुळे स्मार्टवॉचमधील इतर फंक्शन्स जरी व्यवस्थित चालत असले तरी यामुळे, स्मार्टवॉचची बॅटरी लवकर डाऊन होते.

त्यामुळे, केवळ उन्हात बाहेर जातानाच तुमच्या स्मार्टवॉचचा ब्राईटनेस वाढवा. इतर वेळी स्क्रिनचा जास्त ब्राईटनेस ठेवू नका. यामुळे, तुमच्या स्मार्टवॉचची बॅटरी दीर्घकाळ चालण्यास मदत होईल. (Pay attention to the screen brightness)

जीपीएस सेटिंग करा बंद

जीपीएससारखी सेटिंग ही कोणत्याही डिव्हाईसमध्ये असेल तर बॅटरी डाऊन होण्यामागचे हे एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे, ते वारंवार चालू ठेवणे टाळा, यामुळे बॅटरी डाऊन होऊ शकते. त्यामुळे, गरज नसताना स्मार्टवॉचची जीपीएस सेटिंग बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

या व्यतिरिक्त तुम्ही स्मार्टवॉचमधील ब्लूटूथ सेटिंगही बंद करू शकता. केवळ तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हाच वायफाय आणि इतर कनेक्टिव्हिटीचा पर्याय वापरा. (Turn off GPS settings)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

SCROLL FOR NEXT