top 5 safest car in india which got 5 star rating in global ncap cash test check list  
विज्ञान-तंत्र

कुटुंबासाठी सुरक्षित असेल अशी कार शोधताय? हे आहेत काही बेस्ट ऑप्शन

सकाळ डिजिटल टीम

top 5 safest car in India : बरेच जण हे त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करता यावा यासाठी कार खरेदी करतात, परंतु ते वाहनाची किंमत, मायलेज आणि लुक याला जेवढे प्राधान्य देतात तितके सेफ्टी फीचर्सकडे ते लक्ष देत नाहीत. आज आपण तुमचे काम सोपे करण्यासाठी देशातील काही खास गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे आणि त्या सध्या देशात विकल्या जाणाऱ्या सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहेत.

Mahindra XUV700

महिंद्राची XUV700 त्याच्या वेटींग पिरियडसाठी खूप चर्चेत आहे, या वाहनाची बाजारात मागणी इतकी आहे की कंपनीने त्याचा वेटिंग पिरियड वाढवला आहे, महिंद्रा XUV700, दमदार लुक आणि मजबूत इंजिनसह येते, सोबतच या कारला ग्लोबल एनसीएपी द्वारे 5 स्टार रेटिंग मिळले आहे. पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळवणारी XUV700 ही एकमेव थ्री रो SUV आहे.

Mahindra XUV300

सुरक्षा फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनच्या बाबतीत, महिंद्राची XUV300 ही देशातील सर्वात सुरक्षित कार आहे. या कारचा लुक तर उत्तम आहेच त्याच बरोबर याच्या मजबूत इंजिनमुळे या कारची लोकप्रियता आणखी वाढली आहे. महिंद्रा XUV-300, ऑटोमेकर महिंद्राची आगामी सब-कॉम्पॅक्ट SUV, टाटा पंचापूर्वी सर्वोच्च सुरक्षा गुण मिळवणारी देशातील पहिली SUV होती. अडल्ट ऑक्युपेंट्सच्या सुरक्षेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. दुसरीकडे, XUV300 ला मुलांच्या सुरक्षिततेसाठी 4 स्टार मिळाले आहेत.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)

Tata Motors ची सब-कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon ने भारतात खूप लोकप्रिय बनली आहे. सुरक्षा फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत, हे वाहन लहान कुटुंबासाठी परफेक्ट आहे. क्रॅश टेस्ट दरम्यान प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी Tata Nexon ला 5-स्टार रेटिंग मिळाले. त्याच वेळी, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला मुलांच्या सुरक्षेसाठी 3 स्टार मिळाले आहेत.

टाटा पंच

टाटा पंच गेल्या वर्षी 2021 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, तेव्हा लॉन्च करण्यापूर्वी कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली होती आणि त्याला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती. क्रॅश टेस्टमध्ये याला ग्लोबल NCAP कडून प्रौढांसाठी 5 स्टार सुरक्षा रेटिंग आणि लहान मुलांसाठी 4 स्टार रेटिंग मिळाले. जानेवारी 2020 मध्ये Altroz ​​आणि डिसेंबर 2018 मध्ये Nexon आणि 2021 Tigor EV नंतर टाटा पंच देशातील तिसरी सर्वात सुरक्षित कार म्हणून पुढे आली.

टाटा अल्ट्रोझ

टाटा मोटर्सची ही प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोझ ही या यादीत येते. त्याच्या क्रॅश टेस्टमध्ये ग्लोबल NCAP द्वारे प्रौढांसाठी पाच-स्टार रेटिंग आणि लहान मुलांसाठी तीन-तारा रेटिंग मिळले आहे. अल्ट्रोझमध्ये स्थिर रचना आणि फूटवेल क्षेत्र, डोके आणि मान संरक्षण, पुढील सीटमध्ये दोन-व्यक्तींसाठी फीचर दिले आहेत असे सुरक्षा एजन्सीच्या अहवालात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

SCROLL FOR NEXT