TRAI's New rules Mandate Telecoms to Compensate Users for Service Outages for more than 24 hours at a district level esakal
विज्ञान-तंत्र

TRAI New Rules : मोबाईलचं नेटवर्क गेल्यास मिळणार भरपाई; TRAIच्या नव्या नियमाने टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले

TRAI New Rules and Regulations for Telecom Companies : दूरसंचार क्षेत्राचे नियामक ट्राईने ग्राहकांना दिलासा देणारे नवीन नियम जाहीर केले आहेत.२४ तासांपेक्षा जास्त वेळ नेट बंद राहिल्यास, पोस्टपेड ग्राहकांना सूट आणि प्रीपेड ग्राहकांच्या रिचार्ज व्हॅलिडिटी वाढवून द्यावी लागणार आहे.

Saisimran Ghashi

TRAI New Update Mobile Network Problem : मोबाईल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दूरसंचार क्षेत्राचे नियामक ट्राई (Telecom Regulatory Authority of India) ने ग्राहकांना दिलासा देणारे नवीन नियम जाहीर केले आहेत. या नवीन नियमांनुसार, जिल्ह्याच्या स्तरावर २४ तासांपेक्षा जास्त वेळ नेटवर्क बंद राहिल्यास संबंधित मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना भरपाई करावी लागणार आहे.

इतकेच नाही तर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक रक्कमही वाढवण्यात आली आहे. आता ही रक्कम ५०,००० रुपयांवरून वाढून १ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

या नवीन नियमांनुसार, नियमांच्या उल्लंघनाच्या स्वरूपानुसार दंडाची रक्कम १ लाख, २ लाख, ५ लाख आणि १० लाख रुपये अशी राहणार आहे. या नियमांमुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळण्याची हमी मिळते.

यापूर्वी दूरसंचार सेवांच्या गुणवत्तेवर वेगवेगळे नियम होते. मात्र आता ट्राईने "ग्राहकसेवा गुणवत्ता मानके (वायर्डलाइन आणि वायरलेस) आणि ब्रॉडबँड (वायर्डलाइन आणि वायरलेस) सेवा नियमावली, २०२४" अंतर्गत हे केले आहेत.

ग्राहकांना मिळणारा फायदा

  • २४ तासांपेक्षा जास्त वेळ नेट बंद राहिल्यास, पोस्टपेड ग्राहकांना सूट आणि प्रीपेड ग्राहकांच्या रिचार्ज व्हॅलिडिटी वाढवून द्यावी लागणार आहे.

  • दुरुस्तीमध्ये झालेला विलंब किंवा २४ तासांपेक्षा जास्त वेळ नेट बंद राहिल्यास, पोस्टपेड ग्राहकांना त्यांच्या सदस्यता शुल्काच्या प्रमाणात पुढील बिलिंग चक्रात सूट मिळणार आहे.

  • लॅण्डलाइन सेवा पुरवठादारांनाही ग्राहकांच्या तक्रारी ३ दिवसांपेक्षा जास्त काळात सोडविल्या नसल्यास, नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

  • ब्रॉडबँड सेवा पुरवठादारांना ७ दिवसांच्या आत ९८ टक्के कनेक्शन सुरु करावे लागणार आहे.

ग्राहकांना त्यांच्या भागातील 2G, 3G, 4G आणि 5G सेवांच्या कव्हरेजची माहिती मिळण्यासाठी मोबाइल सेवा पुरवठादारांनी त्यांच्या वेबसाइटवर नकाशा दर्शवणे आवश्यक आहे.

या नवीन नियमांमुळे ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून चांगली सेवा मिळण्याची हमी मिळते. तसेच, नेट बंद राहिल्यास त्यांचे नुकसान भरपाई केली जाणार आहे. हे नियम सहा महिन्यांनंतर लागू होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT