Travel Gadgets eSakal
विज्ञान-तंत्र

Travel Gadgets : फिरायला जाताय? सोबत ठेवा हे महत्त्वाचे गॅजेट्स! प्रवास होईल आरामदायक

Long Weekend : बरेच लोक प्रवासात मोबाईल, टॅबलेट किंवा कदाचित लॅपटॉपही घेऊन जातात.

Sudesh

आज (27 सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिन आहे. सध्या सुट्ट्यांचा सीझन असल्यामुळे बरेच जण फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तुम्हीदेखील असाच प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

प्रवासाला जाताना आपण सोबत खाऊ आणि कपडे तर नेतोच. मात्र, आपला प्रवास आरामदायक व्हावा असं वाटत असेल, तर काही खास गॅजेट्स सोबत नेणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गॅजेट्सची माहिती देणार आहोत.

पॉवर बँक

प्रवासात असताना मोबाईलचं चार्जिंग हा एक मोठा प्रश्न असतो. कारमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा असते, मात्र त्याने एका वेळी एकच, आणि तोही अगदी कमी वेळात चार्ज होतो. शिवाय ट्रिपवर फोटो काढल्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी अगदी वेगाने उतरते.

त्यामुळेच एक फास्ट चार्जिंग पॉवर बँक तुमच्यासोबत असणं फायद्याचं ठरतं. साधारण पॉवर बँक ऐवजी 50W, 100W किंवा 85W क्षमतेची पॉवर बँक तुमचा फोन काही मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज करते.

मल्टी-पोर्ट यूएसबी केबल

बरेच लोक प्रवासात मोबाईल, टॅबलेट किंवा कदाचित लॅपटॉपही घेऊन जातात. या सर्व डिव्हाईसेसना चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या वायर्स घेऊन जाणं म्हणजे गुंता वाढवणं. त्यामुळेच मल्टिपल पोर्ट असणारी यूएसबी केबल सोबत नेणं फायद्याचं ठरतं. (Tech News)

ट्रॅकिंग डिव्हाईस

आपल्या वस्तूंवर, बॅग्जवर आणि इतर सामानावर लक्ष ठेवणं अगदीच जबाबदारीचं काम असतं. विशेषतः ट्रेन किंवा अन्य पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करताना तर काही ना काही हरवण्याचा प्रकार घडतोच. त्यामुळेच आपल्या सामानाला ट्रॅक करण्यासाठी तुम्ही ट्रॅकिंग डिव्हाईसचा वापर करू शकता. अ‍ॅपलचे एअर टॅग्स किंवा जिओ टॅग्स अशा प्रकारची उपकरणं तुम्ही वापरू शकता.

हेडफोन्स

खरंतर प्रवासात एकमेकांसोबत गप्पा मारल्याने अधिक मजा येते. मात्र, काही वेळा बसमध्ये वा ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला शांततेची गरज असते. अशा वेळी चांगले नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स तुमच्या मदतीला येऊ शकतात. या हेडफोनच्या मदतीने बोरिंग प्रवासातून सुटका मिळवून तुम्ही प्रवास एंजॉय करू शकाल.

या व्यतिरिक्त तुम्ही ब्लूटूथ स्पीकर, थर्मास, इलेक्ट्रिक रेझर/ट्रिमर असे इतर गॅजेट्स देखील नेऊ शकता. प्रवासात अगदी मोजकं मात्र गरजेचं सामान नेल्यामुळे तुम्हाला जास्त ओझंही होत नाही, आणि प्रवासात अडचणी देखील येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT