Truecaller  Sakal
विज्ञान-तंत्र

Truecaller Features: सरकारी विभागाचे नंबर मिळवणं झालं सोप्पं; कुठे-कसे मिळतील जाणून घ्या

ट्रूकॉलरने अ‍ॅपमध्ये एक कामाचे फीचर उपलब्ध केले आहे. याद्वारे तुम्हाला कोणत्याही सरकारी विभागाचा फोन नंबर सहज मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Truecaller New Features: Truecaller ने यूजर्सला सायबर क्राइमपासून वाचवण्यासाठी डिजिटल गव्हर्मेंट डायरेक्टरी जारी केली आहे. या डिजिटल डायरेक्टरीमध्ये सर्व सरकारी विभाग आणि अधिकाऱ्यांचे व्हेरिफाइड कॉन्टॅक्ट नंबर असतील. म्हणजेच, आता ट्रूकॉलर यूजर्स या डिजिटल डायरेक्टरीच्या मदतीने सरकारी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क करू शकतात. याशिवाय, मंत्री आणि अधिकाऱ्यांचा फोन नंबर अ‍ॅपमध्ये सेव्ह करण्याची देखील सुविधा मिळेल. यामुळे यूजर्स ऑनलाइन फसवणुकीस बळी पडणार नाही.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

सहज मिळेल सरकारी विभागांचे नंबर

ट्रूकॉलरने अ‍ॅपमध्येच व्हेरिफाइड डिजिटल गर्व्हमेंट डायरेक्टरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये तुम्हाला देशातील २३ पेक्षा जास्त राज्य आणि २० केंद्रीय मंत्रालयांचा नंबर मिळेल. कंपनीने ही माहिती थेट सरकारी आणि अधिकृत सुत्रांकडून घेऊन डायरेक्टरीमध्ये समाविष्ट केली आहे. लवकरच जिल्हा आणि नगरपालिका स्तरावर देखील अधिकाऱ्यांच्या नंबरचा समावेश करण्याची कंपनीची योजना आहे.

ऑनलाइन फसवणुकीपासून होईल बचाव

सरकारी अधिकारी भासवून फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, या नवीन सुविधेमुळे सरकारी अधिकाऱ्यांचा खरा नंबर ओळखण्यास यूजर्सला मदत होईल. सरकारी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केली जाते. मात्र, या फीचरमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे.

कंपनीने माहिती दिलीये की, सरकारी अधिकाऱ्याने एखाद्या यूजरला कॉल केल्यास तो नंबर ब्लू टिक आणि हिरव्या बॅकग्राउंडमध्ये दिसेल. ज्यामुळे नंबर व्हेरिफाइड असल्याची माहिती मिळेल. तसेच, स्पॅम कॉल असल्यास लाल रंगाचे बॅकग्राउंड डिसेल व यामुळे यूजर्स अलर्ट होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT