tvs ronin launched in india check price and features here
tvs ronin launched in india check price and features here  
विज्ञान-तंत्र

आज लाँच झाली TVS Ronin, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

TVs Ronin Launched : TVS मोटर कंपनीने आज त्यांची नवीन बाईक Ronin भारतीय बाजारपेठेत 149000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले आहे. ही मोटरसायकल तीन व्हेरियंटमध्ये बाजारात दाखल झाली आहे. त्याच्या सिंगल टोन व्हेरिएंटची किंमत 149000 रुपये, ड्युअल टोनची किंमत 155500 रुपये आणि ट्रिपल टोनची किंमत 168750 रुपये आहे. चला तर मग या बाईकबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (tvs ronin launched in india check price and features here)

नवीन मॉडेलला इंटिग्रेटेड डीआरएल, माउंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टीयर ड्रॉप आकाराची इंधन टाकी, काळ्या रंगाचे इंजिन कव्हर, सिंगल-पीस गोल हेडलाइटसह स्क्रॅम्बलर-शैलीचे डिझाइन देण्यात आले आहे.

या बाईकमध्ये देण्यात आलेल्या फीचर्समध्ये फुल-एलईडी लाइटिंग आणि ब्लूटूथ-सक्षम इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील समाविष्ट आहे. याशिवाय, यात अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स, प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल रिअर मोनोशॉक, दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनल एबीएस मिळतात.

या बाईकमध्ये तुम्हाला 225.9cc सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याची मोटर 7,750rpm वर 20.1bhp चा टॉप आउटपुट आणि 3,750rpm वर 19.93Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. नवीन TVS Ronin लाँच नंतर ही बाईक आता Honda भारतीय बाजारात CB350 RS शी स्पर्धा करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT