X Dating App eSakal
विज्ञान-तंत्र

X Dating App : 'एक्स' आता होणार चक्क डेटिंग अ‍ॅप; इलॉन मस्कने केली घोषणा! - रिपोर्ट

X Elon Musk : एक्सला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याचा मस्क यांचा मानस आहे.

Sudesh

इलॉन मस्कने 'एक्स' (ट्विटर) अ‍ॅप विकत घेतल्यापासून त्यामध्ये कित्येक बदल करण्यात आले आहेत. एक्सला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याचा मस्क यांचा मानस आहे. त्यामुळेच आता एक्स हे डेटिंग अ‍ॅपदेखील होणार असल्याचं म्हटलं जात आहे. बिझनेस इन्सायडरने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इलॉन मस्क यांनी एक्स कंपनीची एक बैठक आयोजित केली होती. एक्सचे व्हिडिओ कॉल फीचर टेस्ट करण्यासाठी ही बैठक होती. यावेळी कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मस्क म्हणाले, की "2024 पर्यंत एक्स हे एक 'फुल-फ्लेज' डेटिंग अ‍ॅप असेल." अर्थात, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर नाही आली.

एक्सला बनवणार एव्हरिथिंग अ‍ॅप

इलॉन मस्कने गेल्या वर्षी तब्बल 44 बिलियन डॉलर्स एवढ्या किंमतीला ट्विटर हे अ‍ॅप विकत घेतलं होतं. त्यानंतर या अ‍ॅपचं नाव, लोगो आणि बऱ्याच गोष्टी इलॉनने बदलल्या. एक्सवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच करण्यात आलं आहे. सोबतच, या अ‍ॅपवर जॉब पोस्टिंग फीचरही सुरू करण्यात आलं आहे. (Tech News)

एक्स अ‍ॅप लवकरच बँकेची जागा घेईल, असंही इलॉन मस्क म्हणाले आहेत. तसंच, यूट्यूब आणि इतर काही अ‍ॅप्सची जागा आता एक्स घेणार असल्याचा विश्वास देखील इलॉन मस्क यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT