विज्ञान-तंत्र

व्हॉट्‌सऍपची दोन नवीन फिचर 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. "स्वाईप टू रिप्लाय' आणि "डार्क मोड' अशी या फिचरची नावे आहेत. याआधारे युजर्सना व्हॉट्‌सऍपचा वापर करणे अधिक सोपे ठरणार आहे. ऍण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी दोन्ही फिचर उपलब्ध केली जाणार आहेत. 

व्हॉट्‌सऍपच्या युजर्सची संख्या दिवसागणिक वाढतीच आहे. युजर्ससाठी नवनवीन फिचर जारी करण्यावर कंपनीने भर दिला आहे. "स्वाईप टू रिप्लाय' फिचरची सध्या कंपनीकडून चाचणी केली जात आहे. या फिचरमुळे आलेल्या मेसेजला केवळ स्वाईप करून उत्तर देणे शक्‍य होणार आहे. युजर्सना उजवीकडे स्वाईप करून समोरच्या व्यक्‍तीला उत्तर देता येईल. सध्या आयफोनवर हे फिचर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्‌सऍपचा अधिक वापर केल्यामुळे डोळ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी नवे "डार्क मोड' फिचर उपयुक्‍त ठरणार आहे. या फिचरमुळे युजर्सच्या डोळ्यांवर ताण येणार नाही. फोनच्या बॅटरीचीही यामुळे बचत होईल. सद्यस्थितीत ट्विटर आणि युट्यूबवर हे फिचर उपलब्ध आहे. 

आणखी काही फिचरवर काम सुरू 
"स्वाईप टू रिप्लाय', "डार्क मोड'बरोबरच आणखी काही फिचर जारी करण्याच्या दृष्टीने व्हॉट्‌सऍपकडून काम सुरू आहे. व्हॉट्‌सऍपवर शेअर केलेले व्हिडीओ तसेच छायाचित्रे यापुढे नोटीफिकेशनमधूनच पाहता येणे शक्‍य होईल. त्यासाठी चॅट उघडण्याची गरज पडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT