TVS Apache  Sakal
विज्ञान-तंत्र

TVS Apache : ‘टीव्हीएस’ अपाचे-१६० सिरीज मोटारसायकलीची दोन नवी मॉडेल

टीव्हीएस अपाचे आरटीआर-१६० आणि आरटीआर १६०-४ व्ही अशा या बाईक्स आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : दुचाकी आणि तीनचाकी प्रकारात आघाडीची जागतिक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने ‘टीव्हीएस’ अपाचे-१६० सिरीज मोटारसायकलीची ‘ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात दाखल केली आहे.

टीव्हीएस अपाचे आरटीआर-१६० आणि आरटीआर १६०-४ व्ही अशा या बाईक्स आहेत. अपाचे आरटीआर १६०-४ व्ही ही देशातील सर्वात शक्तिशाली १६० सीसी ऑइल कूल्ड मोटरसायकल आहे. या दोन्ही मोटारसायकलमध्ये तीन राइड मोड, डिजिटल एलसीडी क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प आदी आहेत.

टीव्हीएसचा साठहून अधिक देशात विस्तार आहे. यामुळेच टीव्हीएस अपाचे हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँड आहे. डिझाइन, तंत्रज्ञानापासून ते रचनेपर्यंत सर्व काही अनोखे असलेल्या या बाईकमध्ये रायडरची सुरक्षितता आणि आराम यावर लक्ष केंद्रित केले आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमिअम बिझनेस हेड विमल सुंबली म्हणाले, ‘‘टीव्हीएसला चार दशकांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा आहे. जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमिअम मोटरसायकल ब्रँडपैकी टीव्हीएस एक आहे. टीव्हीएस अपाचे आरटीआर-१६० सिरीजची नवीन आकर्षक ब्लॅक एडिशन ग्राहकांना अधिक आकर्षित करेल. या दोन्ही मोटारसायकलींची किंमत एक लाख ९ हजारांपासून आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT