Stolen Car Found Using Google Earth eSakal
विज्ञान-तंत्र

Stolen Car : गुगल अर्थ अन् स्नॅपचॅटच्या मदतीने शोधली चोरीला गेलेली कार; तरुणाची कामगिरी पाहून पोलीसही चकित!

जेय याच्या सीट (Seat) आणि फॉक्सवेगन गॉल्फ (Volkswagen Golf) अशा दोन गाड्या चोरीला गेल्या होत्या.

Sudesh

ब्रिटनमधील एका 23 वर्षीय इंजिनिअर तरुणाने टेक्नॉलॉजीची मदत घेऊन आपली चोरीला गेलेली कार शोधली आहे. यासाठी त्याने चक्क गुगल अर्थ आणि स्नॅपचॅट या अ‍ॅप्सचा वापर केला. जेय रॉबिन्सन असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या या कामगिरीने पोलीसही चकित झाले आहेत.

जेय याच्या खरंतर दोन गाड्या चोरीला गेल्या होत्या. सीट (Seat) आणि फॉक्सवेगन गॉल्फ (Volkswagen Golf) अशा या दोन गाड्या होत्या. यानंतर जेय याने पोलिसांत धाव घेतली. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी देखील पोलिसांना याबाबत कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. यानंतर जेयने स्वतःच काहीतरी करायचं ठरवलं.

स्नॅपचॅटवर दिसली कार

जेयने आपल्या कार चोरीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. यासोबतच त्याने आपल्या दोन्ही गाड्यांचे फोटो देखील पोस्ट केले. यानंतर जेमी नावाच्या एका मित्राने त्याच्याशी संपर्क साधला. जेमीने एका स्नॅपचॅट स्टोरीमध्ये जेयची गाडी पाहिली होती. ज्या व्यक्तीने ही स्टोरी पोस्ट केली होती, तिच्याशी संपर्क साधला असता; त्या व्यक्तीने कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाउंड एवढी रक्कम मागितली. (Tech News)

गुगलची मदत

यानंतर जेय आणि जेमी यांनी गाडीच्या फोटोचं निरीक्षण केलं. हा फोटो कुठला आहे शोधण्यासाठी त्यांनी 'रिव्हर्स इमेज सर्च' प्रक्रिया राबवली. यामुळे त्यांना गाडी जिथे पार्क आहे ती इमारत ओळखता आली. या फोटोमध्ये असणाऱ्या एका व्हीली बिनवर (चाके असलेला कचऱ्याचा डबा) तिथल्या हाऊसिंग सोसायटीचं नाव होतं.

यानंतर गुगल अर्थच्या मदतीने जेयने ही हाऊसिंग सोसायटी आणि ती इमारत शोधून काढली. त्यानंतर त्या जागेचा पत्ता त्याने पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता, जेयची सीट गाडी तिथे रस्त्यावर पार्क केलेली दिसली.

"माझी गाडी तिथे पाहून मी किती खुश झालो ते सांगता येणार नाही. माझ्याकडे असलेल्या चावीने ती गाडी लगेच अनलॉक झाली, तेव्हा माझी खात्री पटली की ती माझीच सीट आहे. इतक्या दिवसांनंतर देखील गाडी तिथेच ठेवण्याइतके ते (चोर) मूर्ख असतील असं मला वाटलं नव्हतं" अशी प्रतिक्रिया जेयने दिली.

अर्थात, अद्याप जेयची एकच गाडी मिळाली आहे. आणखी महागडी असणारी फॉक्सवेगन गॉल्फ ही गाडी अजूनही मिळालेली नाही. या गाडीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT