Down Detector eSakal
विज्ञान-तंत्र

Cyberattack Tuesday : फक्त फेसबुक-इन्स्टाच नाही.. तर जगभरातील कित्येक मोठ्या वेबसाईट्स झाल्या होत्या डाऊन!

Global Outage : फेसबुक, इन्स्टाव्यतिरिक्त मेटाच्या थ्रेड्स आणि व्हॉट्सअ‍ॅप या सेवांनाही अडचण येत असल्याची तक्रार यूजर्सनी केली होती. यासोबतच गुगलच्या यूट्यूब, जीमेल, प्लेस्टोअर अशा सेवाही डाऊन होत्या...

Sudesh

Global Outage Cyberattack Tuesday in US : मंगळवारी रात्री जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम यूजर्सना वेबसाईट वापरण्यास अडचण येत होती. मात्र, ही अडचण केवळ या दोन वेबसाईट्सपुरती मर्यादित नव्हती. डाऊन-डिटेक्टर या वेबसाईने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कित्येक वेबसाईट्स चालत नसल्याच्या तक्रारी यूजर्सनी या कालावधीमध्ये केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी अमेरिकेतून आल्या होत्या.

फेसबुक, इन्स्टाव्यतिरिक्त मेटाच्या थ्रेड्स आणि व्हॉट्सअ‍ॅप या सेवांनाही अडचण येत असल्याची तक्रार यूजर्सनी केली होती. यासोबतच गुगलच्या यूट्यूब, जीमेल, प्लेस्टोअर अशा सेवाही डाऊन असल्याचं यूजर्सनी म्हटलं होतं. यूट्यूबने देखील आपल्या सेवेत अडचण येत असल्याचं मान्य केलं होतं. अर्थात काही मिनिटांमध्येच यूट्यूबची सेवा पूर्ववत झाली होती.

कोणत्या वेबसाईट्सबाबत तक्रार?

अमेरिकेतील कित्येक यूजर्सनी AT&T, अमेझॉन, आयरेसिंग, क्विक बुक्स, टी-मोबाईल, व्हॅलोरंट, हनीवेल, मायक्रोसॉफ्ट टीम्स, ऑक्युलस, पोकेमॉन गो, स्नॅपचॅट, पीएनसी, टिकटॉक, डिस्कॉर्ड, स्पॉटिफाय आणि एक्स या सेवाही ठप्प असल्याचं रिपोर्ट केलं होतं. डाऊन डिटेक्टर (Down Detector) या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. यातील जवळपास सर्व सेवा काही तासांमध्ये सुरळीत झाल्या.

सायबर हल्ला की ग्लिच?

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेबसाईट्स डाऊन झाल्यामुळे यूजर्स चिंता व्यक्त करत होते. कित्येकांनी अमेरिकेवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली. तर काही यूजर्सनी डाऊन डिटेक्टर वेबसाईटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. एकाच वेळी एवढ्या वेबसाईट्स डाऊन असल्याचं शक्य नाही, लोक उगाच रिपोर्ट करत आहेत असंही काही नेटिझन्स म्हणत होते.

दोन तासांनंतर जीव भांड्यात

दरम्यान, भारतात केवळ मेटा आणि गुगलच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. सुमारे दोन तास अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर फेसबुक, इन्स्टा आणि थ्रेड्स सुरू झाले. यूट्यूब देखील काही मिनिटांमध्येच पूर्ववत झालं होतं. अचानक फेसबुक-इन्स्टा बंद पडल्यामुळे आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं की काय अशी भीती वाटली होती, मात्र दोन तासांनी सेवा पूर्ववत झाल्यानंतर आपला जीव भांड्यात पडला, अशी प्रतिक्रिया कित्येक यूजर्सनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT