Vi Prepaid Plan sakal news
विज्ञान-तंत्र

Recharge Offers : वर्षभर पाहू शकता फ्री वेब सिरीज; VI कार्डवर आहेत या खास ऑफर्स

दूरसंचार कंपनी Vodafone Idea (Vi) ने Vi Max ऑफर लॉन्च केली आहे. या अंतर्गत सर्वोत्तम पोस्टपेड प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

दूरसंचार कंपनी Vodafone Idea (Vi) ने Vi Max ऑफर लॉन्च केली आहे. या अंतर्गत सर्वोत्तम पोस्टपेड प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जर तुम्ही पोस्टपेड वापरकर्ते असाल तर तुम्हाला अधिक डेटा वापरायला मिळणार आहे. ही योजना Vi च्या सर्व जुन्या आणि नवीन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 Vi Max  ऑफरची प्रमुख वैशिष्ट्ये :

या ऑफर अंतर्गत Vi वापरकर्त्यांना अधिक डेटाचा लाभ मिळेल. यासोबतच नाईट अनलिमिटेड बेनिफिट्सही मिळणार आहेत. याशिवाय Vi Max प्लॅनमध्ये दरमहा 3,000 एसएमएस दिले जातील. व्हॉइस आणि डेटा व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना मनोरंजन आणि प्रवास सवलत  देखील दिली जाईल. या व्यतिरिक्त OTT मध्ये SonyLIV, Amazon Prime, Disney + Hotstar सह Vi Movies आणि TV चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. Vi Max प्लॅनमध्ये फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर सूट दिली जात आहे. MakeMyTrip द्वारे बुकिंग केल्यास ही सवलत उपलब्ध असेल.

401 रुपयांचा प्लॅन :

यामध्ये अनलिमिटेड कॉल्स दिले जात आहेत. तसेच महिन्याला 3,000 एसएमएस दिले आहेत. यासोबतच 50 जीबी डेटा दिला आहे. नाईट अनलिमिटेड प्लॅनही दिला आहे. Sony Liv वर 12 महिन्यांची सवलत दिली आहे. याशिवाय Vi Movies आणि  & TV  मोफत पाहायला मिळणार आहे.

501 रुपयांचा प्लॅन :

यामध्ये 90 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच Amazon प्राइम 6 महिन्यांसाठी मोफत दिले जात आहे. डिस्ने + हॉटस्टार दिला जाईल. यामध्ये सोनी लिव्ह दिलेले नाही. बाकीचे फायदे वरीलप्रमाणेच आहेत. अमर्यादित कॉल सुविधा, दरमहा 3000 एसएमएस, डेटा रोलओव्हर 200 GB इत्यादी सुविधा दिल्या जात आहेत.

701 रुपयांचा प्लॅन: यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासोबतच दरमहा 3,000 एसएमएससह अमर्यादित डेटा दिला जात आहे. तसेच, Amazon Prime आणि Disney + Hotstar Super 6 महिन्यांसाठी मोफत आहे. त्याचबरोबर हंगामा म्युझिक मोफत आहे.

1101 प्लॅन: यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दरमहा 3000 एसएमएससह, अमर्यादित डेटा दिला जात आहे. यासोबतच वर नमूद केलेले सर्व प्रवासी लाभही दिले जातील. याशिवाय Amazon Prime ला Disney + Hotstar Super आणि Sony Live वर 6 महिन्यांसाठी प्रीमियम अॅक्सेस देखील दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT