technology news
technology news  esakal
विज्ञान-तंत्र

VIP Mobile Number : आता व्हीआयपीनंबरही मिळणार फ्री;कसे ते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सध्या लोक व्हीआयपी राहणीमानावर भर देतात. गाडी, कपडे, मोबाईल या वस्तू तर त्यांना ब्रॅन्डेड लागतातच. पण, त्याच बरोबर गाड्यांचे आणि मोबाईलचे नंबरही लोकांना व्हीआयपी हवे असतात. व्हीआयपी नंबरसाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात. काहीवेळा तर या नंबरचा लिलावही करण्यात येतो. मात्र आता दोन कंपन्या व्हीआयपी नंबर फ्रीमध्ये देणार आहेत.

व्हीआयपी नंबर हे इतर कॉमन नंबरसारखे नसतात. एका नजरेत ते पाठ होण्यासारखे असतात. त्यामुळेच त्यांना जास्त मागणी आहे. भारतातील BSNL आणि Vodafone Idea म्हणजेच Vi या दोन कंपन्यांनी व्हीआयपी मोबाईल नंबरसाठी नविन ऑफर सुरू केली आहे. हे नंबर फ्रीमध्ये कसे मिळवायचे हे पाहुयात...

VIP मोबाईल नंबर कसा मिळवायचा?

- कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला न्यु कनेक्शन कॅटेगरी मिळेल.

- या ऑप्शनमध्ये फॅन्सी नंबर कॅटेगरीवर क्लिक करा. आता एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला प्रीपेड कनेक्शन हवे आहे की पोस्टपेड हे सिलेक्ट करा.

- त्यानंतर तूमचा पिन कोड आणि मोबाईल नंबर टाका. आता तुम्हाला हवा असलेला व्हीआयपी नंबर शोधा. तुम्ही Vi च्या फ्री लिस्टमधून कोणताही नंबर निवडू शकता.

- फ्री आणि प्रीमियम यामधील एक नंबर निवडा. प्रीमियम नंबरसाठी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील.

- फ्री मधील कोणताही नंबर तूम्ही निवडू शकता. नंबर सिलेक्ट केल्यावर तुमचा पत्ता टाका. पेमेंट केल्यानंतर, सिमकार्ड तुमच्या घरी येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT