Vodafone Idea News Updates
Vodafone Idea News Updates sakal news
विज्ञान-तंत्र

Vodafone-idea चा धमाका! IPL अन् चित्रपट फ्री; 2 नवीन रिचार्ज प्लॅन लाँच

सकाळ डिजिटल टीम

VI Recharge Plans: आयपीएलचा (IPL) पंधरावा हंगाम सुरू झाला आहे. आणि अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्या डिस्ने + हॉटस्टार (Disney+ Hotstar) प्लॅन घेऊन येत आहेत. जिओ (Jio) नंतर, आता Vodafone-idea ने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध असेल. याआधी कंपनीकडे असे आणखी तीन प्लॅन होते.

Vodafone Idea चा Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन-

Vodafone-Idea चा पहिला प्लॅन 499 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जाईल. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज दिले जात आहेत.

कंपनीने ऑफर केलेल्या दुसऱ्या प्लॅनची किंमत 1066 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा दिला जातो, परंतु या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. 499 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, 1 वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जात आहे. या दोन्ही योजनांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight सारखी वैशिष्ट्ये आहेत.

व्होडाफोन-आयडियाचे जुने डिस्ने प्लस हॉटस्टार प्लॅन-

यापूर्वी, कंपनीकडे 601 रुपये, 901 रुपये आणि 3099 रुपयांचे असे 3 प्लॅन होते, जे Disney + Hotstar अ‍ॅक्सेससह आले होते. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 28 दिवस, 70 दिवस आणि 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासह 16GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटासह 48GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. तर ₹ 3999 च्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज फक्त 1.5 GB डेटा मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT